सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जोमाने कामाला लागले आहेत. शिंदे – फडणवीस सरकारने आतापर्यंत मोठे निर्णय घेतले असून, ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना देखील स्थगिती देण्यात आली आहे.
याचबरोबर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत एक अनपेक्षित प्रकार बघायला मिळाला. या पत्रकार परिषदेत पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वगळण्यात येणार नाही, असाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पण हा निर्णय जाहीर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे एक कागद सरकावला होता. सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे. याचाच धागा पकडत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी म्हंटलं आहे की, ‘आम्ही सत्तेत असताना उद्धव ठाकरे आणि मी आम्ही परस्परांचा मान ठेवला आहे. पण आता इथे उपमुख्यमंत्रीच मुख्यमंत्र्यांचा माईक खेचत आहेत. या सरकारमध्ये नावं घेण्यावरुन मानपान सुरुय,’ असा खोचक टोला अजित पवारांनी त्यांच्या शैलीत मारला.
पुढे बोलतं अजितदादा म्हणाले, ‘शिंदे यांनी कोल्हापूरच्या धैर्यशील माने, आबिटकर, राजेश क्षीरसागर यांचं नाव घेतलं. पण धनंजय महाडिक यांचं नाव घेतलं नाही. नंतर फडणवीस यांनी चिठ्ठीवर नाव लिहून दिलं. सुरुवातीलाच अशी ओढाओढ, चिठ्ठा देणं सुरु झालं तर पुढे काय होणार हे राज्याने पाहावं.’
वाचा नेमकं काय घडलं..?
पत्रकार परिषदेत राज्यात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचं अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येते. पण पश्चिम महाराष्ट्रात पूर आला की कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येत होतं. याबाबतच्या तक्रारी खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी केल्या होत्या, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे असं बोलत असताना यावेळी ते भाजपच्या एका खासदाराचे नाव विसरले होते. हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खिशातून एक कागद काढला. त्यांनी खासदाराचे नाव एका कागदावर लिहिले आणि ते शिंदे पुढे सरकवले. त्या कागदावर धनंजय महाडिक यांचे नाव लिहिलेले होते. ते मुख्यमंत्र्यांनी बघितले आणि लगेचच त्यांचे नाव घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ खेळाडू बनणार रोहितचे शस्त्र, इंग्लंडला टाकणार संकटात
‘सलमानने मला लग्नासाठी विचारलं तर मी नाही म्हणणार नाही’, अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य
‘हे’ दोघंच अख्खा महाराष्ट्राचे मालक; अजित पवार यांचा टोला