अजित पवारांनी सेलिब्रिटींना ‘या’ भाषेत झाप झाप झापले; ‘तेव्हा तुम्हाला कुणी…’

मुंबई | दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटल्यानंतर भारतीय कलाकार आता ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देत आहेत. अमेरिकेतील पॉप स्टार रिहानासह अनेक परदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे.

तसेच त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी ट्विट करून भूमिका मांडली होती. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिंटींना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. याबाबत ते पुण्यात मध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘सेलिब्रेटींना माझी विनंती आहे, दोन-तीन महिने झालेत शेतकरी तिथे बसलेले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केले. कुणी थांबवलेलं होते. आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटलं की, इथं भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते त्यांचं मत आहे,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, ‘प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली. इथं कुणी थांबवलं होतं का? आज शेतकरी तिथे थंडी वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसलं नाही. लोकशाहीत चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. पण ते काहीच त्यांनी केलं नाही. एक ट्विट झाल्यानंतर सेलिब्रेटींनी काय ट्विट केलं हेही आपण पाहिलं,” अशा शब्दात अजित पवारांनी सेलिब्रिटींना सुनावले.

महत्त्वाच्या बातम्या
‘शेतकरी आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक केली, पण…’
ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत? पवारांचे फक्त तीन वाक्य, अन्…
कुठं कुठं जायाचं हनिमूनला! सिद्धार्थने केला ‘तो’ फोटो शेअर, अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.