“होय रे बाबा घेतली मी लस, पण फोटो काढला नाही”, अजित पवारांचा टोला

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने उपस्थितांचे मन जिंकत असतात. अजित पवार कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या हाकेला नेहमी धावून जात असतात. सभेमध्ये विरोधकांवर बेधडक मिश्किल टिप्पणी करत असतात. याचाच प्रत्यय पुण्यामध्ये पत्रकारांना आला आहे.

पुण्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर आढावा बैठक, अधिकाऱ्यांशी चर्चा, लसीकरण मोहिमेबाबत माहिती घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला.

पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, दादा तुम्ही कोरोना लस घेतली का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले होय रे बाबा! मी घेतली कोरोनाची लस. फक्त इतरांसारखा फोटो नाही काढला. मला काढायचाच नव्हता फोटो.

मला तसली नौटंकी आवडत नाही. इतरांनी फोटो काढले कारण त्यांना पाहूण लोक लस घेतील. पण मी फोटो काढला असता तर लस घेणारेही घेणार नाहीत. अजित पवारांचे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला.

दरम्यान अजित दादांनी पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिला आहे. पुण्यात रूग्णसंख्या वाढत असून नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर 1 एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल असा गंभीर इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
दीपाली चव्हाण आत्महत्या! रात्री-बेरात्री बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न…
पतीच पत्नीला दीर आणि सासऱ्यांसोबत संबंध ठेवायला भाग पाडत होता; म्हणाला द्रोपदी बनून राहावं लागेल
चहा पावडर विकून ही महिला बनली करोडो रुपयांची मालकीन; वाचा कशी…
सक्तीने निवृत्त केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा मोदी सरकारला टोला, घराबाहेर लावला ‘हा’ फलक

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.