‘कुणाच्या किती बायका, कुणी किती मुलं लपवली, सांगू का?’; दादांनी भाजपला दिले पवार स्टाईल उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पण त्यानंतर संबधित महिलेने तक्रार मागे घेतली. यावर भाजप नेत्यांनी टिका केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना चांगलचं खडसावले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका केली होती. यावर पवार म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर विषय खूप व लांब जाईल.”

“कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती. लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहे, कशाला खोलात जाण्यास सांगत आहात”, अश्या शब्दात अजित पवार यांनी भाजप नेत्यांना खडसावले आहे.

“आता विरोधक काय म्हणतील याचा नेम नाही. आधी भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाचं समर्थन केलं होतं. नंतर त्या महिलेनं तक्रार मागे घेतल्यामुळे तोंडघशी पडले. आता थातूरमातूर उत्तर दिली जात आहे. आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल केली जात आहे” अशी टीका अजित पवार यांनी केली.

शंकरपाळ्या! ‘एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई’ व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल

“वार्ड रचना रद्द करून ग्रामपंचायत सदस्य जनतेतून निवडा”; भास्कर पेरे पाटलांची मागणी

सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करू पण…..; मध्य रेल्वेने दिली ही माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.