Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते. शाळेत सरस्वतीच्या फोटोऐवजी महापुरुषांचे फोटो लावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने वादाला आमंत्रण दिले होते.
सरस्वती माता आणि शारदा मातेला आम्ही कधीच पाहिले नाही. त्यांनी आम्हाला शिकवले नाही. त्यांनी केवळ तीन टक्के लोकांना शिकवले आहे. त्यामुळे शाळेत त्यांचे फोटो का लावायचे? त्यापेक्षा शाहू, फुले यासारख्या महापुरुषांचे फोटो लावा, असे छगन भुजबळ एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.
त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून प्रचंड वादही निर्माण झाला होता. भुजबळांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रियाही दिली आहे. परंतु, ते आपल्या शाळेत सरस्वती मातेचे फोटो न लावण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. शाळेतून सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत. कोणाला काय वाटते हे आम्ही करणार नाही, आम्ही लोकांना जे वाटेल तेच करणार आहोत, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळांचे वक्तव्य हे वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी संबंध नाही, असे ते म्हणाले आहेत. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांचे ते वैयक्तिक वक्तव्य आहे. प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. भुजबळांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. पण पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही, असे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Ajit pawar : अजित पवार हे वस्तुस्थिती जाणणारे नेते; फडणवीसांविरोधात केलेल्या त्या विधानावरून चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
Ajit pawar : ऑफीसर असला म्हणजे काय शिंगं आली का? पोलीस अधिकाऱ्यावर संतापले अजित पवार, वाचा काय घडलं
भर अधिवेशनात शरद पवारांच्या समोरून उठून गेले अजित पवार, वाचा नेमकं काय घडलं?
..अन् नाराज अजित पवार थेट कार्यक्रमातूनच बाहेर पडले; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात हायहोल्टेज ड्रामा