‘कोरोना’चा हाहाकार! अजित पवारांनी पुण्यातील लॉकडाउनसंबंधी केले मोठे भाष्य, म्हणाले….

मुंबई : महाराष्ट्रात बुधवारी विक्रमी ३१ हजार ८५५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करूनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे.

अनेक शहरांनी रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीसंबंधी माहिती दिली असून लॉकडाउनसंबंधीही भाष्य केले आहे. ते याबाबत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मोठ्या प्रमाणात करोनाचं संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढलं आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे.

तसेच पालकमंत्री नात्याने उद्या पुण्यात लोकप्रतिनिधींना बोलावालं असून दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉकडाउनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

गेल्या ५ महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी
देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे.

गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“फडणवीस रोज पहाटे उठून राज्यपालांना फोन करून विचारतात मी पुन्हा येऊ का?”

“सुशिक्षित लोकं जास्त असल्याने भाजपला मते मिळत नाहीत”; भाजप नेत्याची कबुली

गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.