‘ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. रोहित तू स्वतः थांबून तो उतरुन घे’; अजितदादांचा मध्यरात्री आबांच्या मुलाला फोन

सांगली । राज्यात कोरोना काळात ऑक्सिजनची मोठी कमतरता भासू लागली आहे. अनेकांचे जीव देखील ऑक्सिजनमुळे गेले आहेत. दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यामुळे अनेकजण ऑक्सिजनसाठी पळापळ करत आहेत.

तसेच रुग्णालयात बेड्स, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातून देखील ऑक्सिजनची मागणी केली जात होती.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री साडेबारा वाजता दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन केला. ‘रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे’. अशी सूचना अजित पवार यांनी दिली.

यावर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरुन घेतला. आणि गरज आहे तिथे पाठवण्याची व्यवस्था त्यांनी केली. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

त्यांनतर यातील २३ जम्बो टाक्या आणि २ डुरा टाक्या ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा पोहोचले. ऑक्सिजनभावी रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने मोठी पळापळ केली.

यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असून यावर ऑक्सिजनची देखील मागणी केली जात होती. यामुळे अजित पवार यांनी लगेच ऑक्सिजनची व्यवस्था केली.

ताज्या बातम्या

कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाजले बारा; वृद्धावर सायकलवरून मृतदेह नेण्याची आली वेळ

हिंमत असेल तर २०२४ ला लढा, कोण दंड थोपटतय दाखवतो; भालकेंचे परीचारकांना थेट आव्हान

एका व्यक्तीजवळ किती सोनं असावे? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, नाहीतर सोनं होईल जप्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.