महाराष्ट्रदिनी राज्याला मिळणार मोफत लसींचं मोठं गिफ्ट; अजित पवारांनी दिले संकेत

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावले आहे. तसेच राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लसीकरण आणि ऑक्सिजनसह इतर सामग्रीच्या पुरवठ्याविषयी महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील नागरीकांनी मोफत लसीचे गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार करता रुग्णालयातून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बरेच रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठी घेतोय, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच १८ ते ४४ वयामध्ये लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार राज्यांवर देत आहे. आम्ही ५ जणांची कमिटी बनवत आहोत. त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

बल टेंडरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस मग ती सिरम असो, वा भारत टेक किंवा फायजर. ज्या कोणत्याही असतील त्या सर्वांचा उल्लेख असेल. इंजेक्शनचा तुडवडा आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तसं आहे, असेही अजित पवार म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

डॉ. रवी आरोळे: ना रेमडेसिवीर, ना महागडी औषधं, तरी ३७०० कोरोना रुग्णांना बरा करणारा देवमाणूस
जीव गेला तरी बेहत्तर, पण व्यसन जाणार नाही! व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा तंबाखु मळतानाचा विडिओ बघाच
कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?; आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितली तारीख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.