अजितदादा तब्बल १३ नगरसेवक फोडत भाजपला देणार मोठा धक्का; स्वत:च केले जाहीर

लवकरच महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षातील नेते आपआपल्या पक्षाच्या प्रचाराला लागले आहे. याच पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.

पुण्यातले काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा अजित पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकाला काही महिने शिल्लक असताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. पुण्यातील भाजपचे १३ नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. पण मी खालच्या पातळीवरचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना मी संधी दिली आहे. पालिका हाती असल्यास चांगलं काम करता येते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

विकासाच्या दृष्टीकोन समोर ठेवूनच आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्षे काम केले. पण २०१३-१४ मध्ये देशात नरेंद्र मोदीची हवा होती. त्यामुळे चांगले काम करुनही आम्हाला पराभव पत्कारावा लागला, असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावला आहे.

तसेच आता मात्र भाजपचे नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. ज्यांना यायचंय त्यांनी पात्र ठरता कामा नये, असे मी त्या नगरसेवकांना सांगितले आहे. असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

जर नगरसेवक अपात्र ठरल्यावर ६ वर्षे निवडणूक लढता येणार नाही. आता ते पक्षात आले आहेत, ते अपक्ष आहे. असेही काहीजण संपर्कात आहे. ज्यांचे पती नगरसेवक आहेत किंवा पत्नी नगरसेविका आहे, तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहे, असा दावा अजित पवारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून चंद्रकांत दादा म्हणताय त्यांना माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊतांनी सांगितली ‘आतली’ गोष्ट
नवज्योत सिंग सिद्धू यांना राखी सावंत म्हटल्याने आपचा नेता वादात, बॉलीवूडमधूनही संताप  
बाजारात आलाय फक्त छोट्याश्या डब्बीमध्ये मावनारा भलामोठा गाडीचा कव्हर; जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.