पीडित महिलेला अजित दादांनी ऑन द स्पॉट मिळवून दिला न्याय, पोलिस पतीसह कुटुंबावर दाखल केला गुन्हा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाज स्वभावाचा अनेक किस्से व्हायरल होत असतात. आता अशीच घटना शुक्रवारी पुणे कौन्सिलच्या आवारात घडली आहे. कुटुंबाच्या हिंसाचारामुळे पीडित असेलल्या एका महिलेला अजित पवारांनी ऑन द स्पोट न्याय दिला आहे.

अजित पवार एका बैठकीसाठी पुणे कौन्सिलच्या आवारात आले होते. त्यावेळी एका कुटुंबाच्या हिंसाचारामुळे पीडित असलेल्या तरुणीने थेट अजित पवारांची भेट घेतली व आपल्यासोबत धक्कादायक घटना सांगितली.

त्यानंतर अजित पवारांनी जागेवरुनच पुणे पोलिसांना हाक मारली आणि त्यांना सुनावले. अहो पोलिस कमिशनर, हे पाहा. आम्ही पोलिसांच्या चांगल्या कामाचे एकाबाजूने कौतुक करतो अन् दुसरीकडे तुमचे पोलिस काय करताय? त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता लगेत अजित पवारांकडे आले.

तेव्हा महिला म्हणाली, साहेब मला तुमच्याकडे तक्रार आहे आणि लगेच आपल्या हातातले पत्र अजित पवारांच्या हातात दिले. अजित पवार निवेदन वाचत असतानाच महिलेनी काय घडले ते सांगण्यास सुरुवात केली.

साहेब, माझा नवरा आणि सासरे दोघंही पोलीस आहेत. पण मला माहेराहून पैसे आणायचा दबाव आणताहेत, मला मारहाण करताहेत. मी आता सासरी राहात नाही. मलाही लहान मुलगी आहे हो…त्या तरूणीचे बोट धरलेली एक चिमुकली मुलगी आपल्या निष्पाप डोळ्यांनी पवार यांच्याकडे पाहात होती.

अजित पवारांनी लगेच ते निवेदन आयुक्तांच्या हातात देत तातडीने चौकशी करा, त्यांना दम द्या. असे चालणार नाही म्हणावं त्यांना, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर अजित पवार तिथून निघून गेले.

आता याप्रकरणी संबंधित पोलिस नाईक असलेल्या पतीवर आणि त्याच्या कुटुंबावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण आणि धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेचा पती पोलीस नाईक योगेश पुरूषोत्तम सवाने (३२), सासरे पुरूषोत्तम भिमराव सवाने (६९), सासू आशा पुरूषोत्तम सवाने (६०) यांच्यासोबत सर्व कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

तब्बल २३ वर्षांचे शत्रुत्व विसरुन भाजप नेत्याला भेटले ज्योतिरादित्य सिंधिया; जाणून घ्या शत्रुत्वाचे कारण
‘ही तर बेसुऱ्यांची फौजच!’ सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
कार्याला सलाम! महाराष्ट्र पोलीस रेहाना बनल्या कोरोना संकटात सापडलेल्या ५० मुलांच्या आई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.