भाषणादरम्यान अजित पवारांना एकाने दिला मास्क काढण्याचा सल्ला, अजित पवार म्हणाले..

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. आज ते पंढरपूर पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारसभेत गेले होते. त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना संकट दूर व्हावे यासाठी पांडुरंगाला साकडे घातले.

पण यावेळी खूप गर्दी उसळली होती. लोकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले. सभेमध्ये असताना एकाने थेट अजित पवारांना चिठ्ठी पाठवली. त्यावेळी भाषण करताना अजित पवारांना ती चिट्ठी मिळाली त्यात लिहिले होते की दादा मास्क काढून बोला.

त्यावेळी अजित पवार म्हणाले की मी जनतेला सांगतोय मास्क घाला आणि हा शहाणा मला सांगतोय मास्क काढा. त्यांनी ही चिट्ठी जाहिरपणे वाचून दाखवली. त्यांनतर पूर्ण सभेत एकच हशा पिकला. त्यांनंतर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

एकीकडे सभेमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडाला तर दुसरीकडे अजित पवारांनी पांडुरंगाला कोरोनाचे आलेले संकट दूर कर म्हणून साकडे घातले. अजित पवार म्हणाले की, कोरोना राज्यात वाढलाय आणि त्यासाठी नियम पाळावे लागतात.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने लस दिली पाहिजे. जनतेने आमच्यावर प्रेम केले म्हणून तीस वर्षे राजकारणात आहोत. भाजप हा पक्ष ग्रामीण भागात जास्त लोकप्रिय नाही. अजून काही प्रश्न सोडवायचे असतील तर ते प्रश्न सोडवायची धमक फक्त महाविकास आघाडीत आहे, असंही अजित पवार म्हणाले.

“केंद्राने महाराष्ट्राला लसीचा पुरवठा करावा”
लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसेही जगली पाहिजेत. १८ वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या. परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या लोकांना लस द्या, महाराष्ट्रात लसींचा पुरवठा कमी पडतो आहे. स्वतःच पोट उपाशी ठेऊन दुसऱ्याला लस दिली जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सिरमवर केंद्राचे कंट्रोल आहे.

नाहीतर आम्हीच सिरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र यामध्ये राजकारण केले जात आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. या सभेच्यावेळी भाजप नेते कल्याणराव पवार यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावरुन अजित पवारांनी भाजपला टोला दिला. ते म्हणाले की कल्याणराव पवार साहेबांच्या भेटीला आले की भाजपच्या पोटात दुखायला लागलं.

महत्वाच्या बातम्या
अभिषेक अमिताभ बच्चनचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न केले? अभिषेक म्हणतो..
रुग्णवाहिका मिळत नसेल तर पटकन करा ‘या’ नंबरवर फोन, १५ ते २० मिनिटांत होईल उपलब्ध
ऑनलाईन पेट्रोल-डिझेल विकण्याचा व्यवसाय सुरू करा आणि करोडो कमवा, जाणून घ्या..
परिस्थीती खूप गंभीर, सरकारला सहकार्य करा; शरद पवारांची कळकळीची विनंती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.