अजित पवार गरजले; ‘माझ्या बारामतीत सावकारी चालणार नाही, अन्यथा…’

मुंबई | ‘मनगटशाहीच्या जोरावर जर बारामतीकरांना कोणी अडचणीत आणणार असेल आणि कायदा जुमानणार नसेल तर त्याला तडीपार करीन, मोक्का लावेन, मग तो किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय करणार नाही, अशा शब्दात सावकारीच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार गरजले.

आपल्या नातेवाईक किंवा कुणी जवळचा असेल तर त्याला आजच या सावकारी प्रकारापासून दूर राहण्यासाठी समजून सांगा असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे. बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘बारामतीतील सावकारीचे प्रकार मध्यंतरी माझ्या कानावर आले आहे. शहरात प्रितम शहा यांनी सावकारीतून आत्महत्या केली. त्यांच्या फोनचे संभाषण ऐकायला मिळाले. तुम्ही प्रत्येकाने सावकारीपासून बाजूला रहा. यदाकदाचित जर कोणी त्याच्यामध्ये सापडला तर त्यात एकतर तडीपार करेन, मोक्का तरी लावेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, नंतर तुम्ही माझ्याकडे येवून, दादा चुकून झाले. चुकून झाले, एवढ्या वेळेला माफ करा असे म्हणालं. पण कोणी मायेचा लाल आला तरी माफ करणार नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कोणी किती मोठ्या बापाचा असो किंवा छोट्या बापाचा, मला काही घेणं नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
विराट आणि अजिंक्यमध्ये कर्णधारपदासाठी टक्कर? अजिंक्यने दिलेले उत्तर वाचून कौतुक कराल  
घासून नाही रे ठासून! संकट आली पण हरले नाही, भारताने ‘असा’ खेचला रोमांचक विजय
‘आला रे आला अजिंक्य आला’, रहाणेचे जंगी स्वागत; कडेवर लेकीला घेऊनच स्वागताचा केला स्वीकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.