Share

Ajit Pawar : ‘माझा आवाज थोडा मोठा आहे, तुम्ही लगेच…’, अजित पवारांनी सरपंचांना झापल्यावर दिलं स्पष्ट उत्तर, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पहाटेच्या सुमारास हिंजवडी (Hinjewadi) परिसरात अचानक पाहणी केली. माहिती मिळालेल्या समस्यांच्या अनुषंगाने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पाहणीदरम्यान हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर (Ganesh Jambhulkar) यांना त्यांनी जाहीरपणे सुनावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “माझा आवाज थोडा मोठा आहे, पण मी कोणालाही झापायला आलो नाही.”

नेमकं काय घडलं?

पाहणी संपल्यानंतर सरपंच गणेश जांभुळकर (Ganesh Jambhulkar) काही शंका उपस्थित करत होते. त्यावर अजित पवार (Ajit Pawar) संतप्त होत म्हणाले, “आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं संपूर्ण IT पार्क बाहेर चाललंय. माझ्या पुण्यातून, महाराष्ट्रातून सगळं बंगळुरु (Bengaluru), हैदराबाद (Hyderabad) इथे चाललंय. काय वाटतं तुम्हाला? मी इथे पहाटे सहा वाजता येतो, माझी माणसं नाहीत का? मंदिर जातातच की धरण करताना, ऐका आणि सांभाळा.”

सरपंचांना झापलं?

अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट सांगितलं की, “सरकारी कामात कोणी अडथळा आणला तर थेट IPC 353 लावा. कोणीही असो, अगदी मीही असलो तरीही लावा. नाहीतर हे काम पुढे सरकणार नाही.”

स्पष्टीकरण देताना अजित पवार काय म्हणाले?

पाहणी नंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “माझा आवाज मोठा आहे, म्हणून लगेच सांगितलं जातं की मी अमक्याला झापलं. पण माझा कोणालाही झापण्याचा उद्देश नसतो. सर्वांचा मला आदर आहे. अधिकारी आणि सहकारी चांगलं काम करत आहेत. आपल्याला फक्त वेगाने आणि काटेकोरपणे काम करायचं आहे.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now