Share

असा खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करा, गरीब मुलांना वह्या पुस्तके घेऊन द्या – अजितदादा पवार

Ajit-Pawar-2

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थित पुण्यात(Pune) ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना क्रेनने हार घातला. यावरून अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.(ajit pawar give advice to political workers)

खराडी येथील ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमावेळी आयोजित केलेल्या सभेत अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. “असा हार मी आयुष्यात कधीच घातला नाही. पण असा खर्च करण्याऐवजी ज्याला गरज आहे त्याला मदत करा”, असे अजित पवार म्हणाले.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना क्रेनच्या साहाय्याने हार घातला. यावर अजित पवार म्हणाले की, “असा हार मी आयुष्यात कधीच घातला नाही. बारामतीत मी एवढ्या मतांनी निवडून आलो, तेव्हा देखील मी असा हार घातला नाही. कार्यकर्त्यांनी असा खर्च करण्याऐवजी ज्याला गरज आहे त्याला मदत करा.”

“कुणाला वह्या पुस्तकांना पैसे लागत असतील तर त्याला मदत करा. मला कुणाचा हिरमोड करायचा नाही”, असे देखील अजित पवार म्हणाले. मार्च महिन्यातील १४ तारखेला पुणे महानगरपालिकेतील नगरसेवकांची टर्म संपत आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व ठिकाणी विकास कामांचे उदघाटन होत आहे. सर्व पक्ष आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार तयारी करत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “आपल्या विचाराच्या महापालिका निवडून आल्या तर अधिक जोमाने काम करता येईल. काही जण सत्तेत येणार काही जण विरोधात असणार आहेत. मात्र यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, कुणाला तरी संपवण्याच काम केलं जातय. हे होता कामा नये.”

ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारकडून आयोग नेमण्यात आला आहे. दोन ते तीन महिन्यात त्यांनी डेटा गोळा करावा, त्यासाठी आम्ही त्यांना सर्व दिलं आहे. त्यामुळे दोन ते तीन महिने निवडणूका लांबण्याची शक्यता आहे.”

महत्वाच्या बातम्या :-
उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर बाबाची क्रेझ, समर्थक हातावर गोंदवत आहेत बुलडोझर बाबाचा टॅटू
बॉलिवूडमध्ये तुझा छळ होतो का? अभिनेता कार्तिक आर्यनने सोडले मौन
सत्तेत येण्यापु्र्वीच भगवंत मान यांचा मोठा निर्णय, माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा घेतली काढून

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now