पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रानेच कमी करावेत, फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे प्रतिउत्तर

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने आज(सोमवारी) कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. यादरम्यान विरोधकांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. राज्याकडून पेट्रोल-डिझेलच्या करात सूट न दिल्याने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. मात्र, विरोधकांना राजकारणचं करायच असल्याने त्यांना ते दिसणार नाही. असे प्रतिउत्तर अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलच्या करात सूट न दिल्याची टीका केली होती. या टीकेवर अजित पवार म्हणाले, केंद्राने इंधनावर भरमसाठ कर लावला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्रानेच कर कमी करायला हवा.

तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे राज्यात आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे इंधनावरील टॅक्स कमी करता येणार नाही. उलट केंद्राकडे असलेले राज्याचे पैसे त्यांनी लवकर द्यावे, असेही अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ताधाऱ्यांना इंधन दरावर बोलण्याचा अधिकार रहिला नाही असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रोज पेट्रोल-डिझेलचे बोर्ड घेऊन येणारे सत्तापक्षाचे आमदार यांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने २७ रुपयांपैकी एक नवा पैसाही पेट्रोल-डिझेलवर कमी केलेला नाही.

त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल १० रुपये महाग आहे कारण राज्य सरकारचा कर जास्त आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढीवर बोलणाऱ्या राज्य सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीत मिळणार सुट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
मोठी बातमी! अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ घोषणा
“ही सगळी बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गँग”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.