धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात…

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, ‘याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते.’

याचबरोबर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली. असे आरोप करणारे काही तथ्य समोर आले नाही,’ असे ते म्हणाले.

तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले…
मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली. याबाबत माध्यमांशी बोलताना पवार म्हणतात, ‘रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही,’ असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, ‘या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हृदय हेलावून टाकणारी घटना; ‘आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन्…’
धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…
नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत उडाली खळबळ; म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.