स्व:ताच पोट उपाशी ठेऊन दुसऱ्यांना लस दिले जाते; परदेशात लस पाठवण्यावरून दादा भडकले

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. आज ते पंढरपूर पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारसभेत गेले होते. त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना संकट दूर व्हावे यासाठी पांडुरंगाला साकडे घातले.

अजित पवार म्हणाले की, कोरोना राज्यात वाढलाय आणि त्यासाठी नियम पाळावे लागतात. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने लस दिली पाहिजे. जनतेने आमच्यावर प्रेम केले म्हणून तीस वर्षे राजकारणात आहोत.

भाजप हा पक्ष ग्रामीण भागात जास्त लोकप्रिय नाही. अजून काही प्रश्न सोडवायचे असतील तर ते प्रश्न सोडवायची धमक फक्त महाविकास आघाडीत आहे. काळानुसार नवीन लोकांना संधी द्यावी लागते. पुढे ते म्हणाले की, लोकांना लॉकडाऊन नको आहे.

शेवटी माणसेही जगली पाहिजेत. १८ वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या. परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या लोकांना लस द्या. स्वतःच पोट उपाशी ठेऊन दुसऱ्याला लस दिली जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सिरमवर केंद्राचे कंट्रोल आहे.

नाहीतर आम्हीच सिरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र यामध्ये राजकारण केले जात आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, शरद पवार असेही म्हणाले की, कल्याणराव पवार साहेबांकडे चालले की भाजपच्या पोटात दुखायला लागलं.

भाजपचे सगळे कल्याणरावांच्या घरी जायला लागले. शरद पवार साहेबांचा कल्याणराव काळे यांच्याकडे निरोप आहे की भगीरथ चांगल्या मतांनी निवडून आला पाहिजे, असं अजित पवार कल्याणरावांना म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.