मिठाचा खडा टाकू नये; अजित दादांनी मोजक्या शब्दात संजय राऊतांना सुनावले

मुंबई : राज्यात सध्या सुरु असलेल्या संजय वाझे प्रकरणावरुन आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर देशात खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्येही वेगळीच कुजबूज असल्याची चर्चा आहे.

अशातच, शिवसेना नेते आणि खासदार संजय यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर रोखठोकच्या माध्यमातून टीकेचे बाण चालवले. ‘देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले,’ असे राऊत यांनी म्हंटले आहे.

राऊतांच्या या विधानावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘राज्यात तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून काम करते आहे. या सरकारमध्ये कोणाला मंत्री करायचे, हा त्या त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी, विशेषतः या तीन पक्षांमध्ये असलेल्या कुणीही त्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये,’ असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे सर्वोच्च नेते आहेत. ते पक्षातील कोणत्या नेत्याला मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या पक्षातील कोणत्या नेत्यास मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तोच प्रकार काँग्रेसमध्ये देखील आहे.’

दरम्यान, ‘अशा परिस्थितीमध्ये कोणाला मंत्री करायचे हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. यापूर्वी देखील काँग्रेसमध्ये असताना पवार साहेबांनी सुधाकरराव नाईक असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या देताना भूमिका पार पाडली होती, असे अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

उलट उत्तर देणाऱ्या मिथून चक्रवर्तीचा राजकुमारने असा अपमान केला की, त्यांनी रडायला केली होती सुरुवात

प्रेग्नेंट हेमा मालिनीला अमिताभ बच्चनने दिली होती ‘अशी’ ऑफर की धर्मेंद्रचा राग झाला अनावर

निवेदिता सराफ गेल्या ११ वर्षांपासून करत आहेत साईड बिझनेस, या मोठ्या ब्रॅंडच्या आहेत मालकीण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.