‘आघाडी करून लढायचे की एक एकट्याने हे वरिष्ठ ठरवतील; कुणी बिनकामाचा सल्ला देऊ नये…’

मुंबई | पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे.

ते म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खच्चीकरण झालं असून राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे

याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनाच खडे बोल सुनावले आहे. ‘आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील,असे अजित पवार म्हणाले.

याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते पुढे बोलताना म्हणाले, ‘आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही. एकत्रितपणे लढण्याचे परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे, असा टोला त्यांनी मारला.

हिंमत असेल तर…

पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे.

पुढे ते म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खच्चीकरण झालं असून राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

..तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य पुरुषोत्तम बरडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यंदा पुण्याची लढत प्रतिष्ठेची झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

आता भाजपनेही कंगनाला फटकारले; ‘या’ प्रकरणी जाहीर माफी मागण्याचा दिला आदेश
शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..
मराठवाड्यानेही भाजपला डावललं; सतीश चव्हाणांची तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.