काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद सुरु असल्याची चर्चा आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारीवरुन हा संघर्ष अजून वाढल्याचे दिसून आले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच त्यांनी विधीमंडळ नेते पदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अनेक नेते याप्रकरणी प्रतिक्रिया देत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनांही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी एक मोठा खुसाला केला आहे.
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला अशी बातमी मी माध्यमांमध्ये पाहिली. मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त फोन केला होता. त्यावेळी मी बोललो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. तु्म्हाला दिर्घायुष्य लाभो. पण एक बातमी आहे त्याबाबत विचारावं की नाही असा प्रश्न मला पडला आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, मी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा, मी विधीमंडळ नेतेपदाचा राजाीनामा दिला आहे. तो माझ्या पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा निर्णय घेईल.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारीवरचा हा वाद समोर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीत मोठं राजकारण झालं असं बाळासाहेब थोरातांनी म्हटले आहे.
सत्यजीत या निवडणूकीत विजयी झाले. पण जे राजकारण झालं ते व्यथित करणारं होतं. मी याबाबतची माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे या मताचा मी नाही. आता याबाबतचा योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे बाळासाहेब थोरातांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अखेर ठरलं! ‘या’ दिवशी प्रभास आणि क्रिती सेनन करणार साखरपुडा, एंगेजमेंटचे ठिकाण वाचून शॉक व्हाल
सकाळी विरोधात बातमी टाकली, दुपारी गाडी खाली येऊन पत्रकाराचा मृत्यू, शिंदे-फडणवीसांशी कनेक्शन?
एकनाथ शिंदेंना आव्हान देणं आदित्य ठाकरेंना पडणार महागात, वरळीतील आमदारकी आली धोक्यात?