उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, चर्चांना उधाण

कोल्हापूर । मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून मराठा समाज आक्रमक झालेले दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले असून, ते राज्यभरात आंदोलन करत आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन आज श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली आहे. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये अनेक चर्चांना उधान आले आहे. अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहे.

अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते, अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती.

संभाजीराजे यांनी १६ तारखेला कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, दरम्यान, दुसरीकडे संभाजीराजे मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहे.

काही दिवसांपूर्वी माओवाद्यांनी मराठा समाजातील तरुणांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला संभाजीराजेंनी पत्रातूनच उत्तर दिले आहे. आता मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार संभाजीराजे यांनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांच्या देखील भेटी घेतल्या आहेत. आता या बैठकीमुळे अनेक पुढे काय होत हे पाहणे गरजेचे असणार आहे. परवापासून ते आंदोलन सुरू करणार आहेत.

ताज्या बातम्या

पाच मुलींचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा, लाडक्या बाबांना दिला शेवटचा निरोप

‘हम आपके है कौन’ चित्रपटात सलमान खानच्या मागे पळणारी रिटा आठवते का? आज दिसते ‘अशी’

‘अग्गबाई सुनबाई’मध्ये नवीन वळण; आसावरीला कळणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याविषयी?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.