Share

Ajit Pawar: दुपारी वेळ काढतो अन् सिमेंट लावायला, टचअप करायला येतो; बीड दौऱ्यात अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बीड (Beed) जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयाच्या पाहणीने झाली. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीतील काही विभागांची त्यांनी तपासणी केली. पाहणीदरम्यान काही कामांमध्ये अचूकता न दिसल्याने अजितदादांनी डॉक्टरांसह अधिकाऱ्यांना कानउघडणी केली.

सिमेंटच्या कामावरून थेट टिप्पणी

रुग्णालयात तपासणीदरम्यान एसीखालील भाग नीट सिमेंट न लावल्याचे अजित पवारांच्या लक्षात आलं. त्यावर ते म्हणाले, “छोट्या छोट्या गोष्टी नेमक्या झाल्या पाहिजेत. जर सिमेंट नीट लावलं नसेल तर मीच दुपारी वेळ काढून टचअप करायला येतो.” यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, ही कामं डॉक्टरांची नसून सार्वजनिक बांधकाम विभागाची आहेत. इंजिनिअरना आपण पगार देतो, मग त्यांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे.

अजित पवारांनी केलेल्या या टीकेतून त्यांच्या काटेकोर कामकाज शैलीचं दर्शन झालं. चांगल्या कामांचं त्यांनी कौतुकही केलं, पण बारीकसारीक त्रुटींवर अधिकाऱ्यांना झापलं. यावेळी रुग्णालय परिसरात येणाऱ्या व्यक्तींना योग्य शिस्त पाळण्याचं निर्देशही दिले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थिती

अजित पवारांचा बीड दौरा केवळ पाहणीपुरता मर्यादित नसून ऐतिहासिक सोहळ्याशीही जोडलेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (Marathwada Liberation Day) निमित्त बीड येथे 17 सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी प्रियदर्शनी उद्यान येथे हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहण करून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शनही केलं.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now