“अजित दादा कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का”

मुंबई । राज्यात झालेल्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. भाजपला या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीनंतर आता देखील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत विरोधकांना टोला देखील लगावला आहे. यावरच आता भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका करत उत्तर दिले आहे.

ट्विट करत ते म्हणाले, वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?, असे म्हणत निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान अजित पवार म्हणाले होते की, पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झाले. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावे घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. असे अजित पवार म्हणाले होते.

काल देखील निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख ३ भाडखाऊ पक्ष असा केला होता. दरम्यान राणे कुटुंबातील सदस्य रोज या महाविकास आघाडीवर टीका करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.