Ajay Nagrath :नुकतीच ‘बडे अच्छे लगते हैं २’ फेम अभिनेता अजय नागरथ याचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे तो यातून थोडक्यात बचावला आहे.
अजय नागरथ हा दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या गाडीने त्याला धडक दिली व त्याचा अपघात झाला. या अपघातामुळे त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या. अजय शूटिंगसाठी जात असताना मुंबईतील मॉडेल टाऊन (अंधेरी) येथे ही घटना घडली.
परंतु, यात आपलीच चूक असल्याचे अजयने कबूल केले आहे. त्यामुळे त्या गाडीवाल्याला दोष देऊ नये, असेही तो म्हणाला. अजयने एका मुलाखतीत सांगितले की, “खरं तर मी उजवीकडे गाडी चालवत होतो. तेव्हा मला अचानक आठवलं की, मला डावीकडे वळायचं आहे. माझ्या पाठीमागून एक कार येत होती आणि ती माझ्या दुचाकीला धडकली.”
पुढे तो म्हणाला की, ”मला कोणतेही फ्रॅक्चर झाले नाही पण मी संपूर्ण शरीराचा एमआरआय केला आहे. मला अनेक जखमा झाल्या आहेत आणि माझ्या शरीरात खूप वेदना होत आहेत. मी देवाचे आभार मानतो की, मी हेल्मेट घातले होते. हेल्मेटसुद्धा खराब झाले आहे.”
तू बाईक ऐवजी कारने का जात नाही? या प्रश्नावर अजय म्हणाला की, “तुम्ही मुंबईत प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही. अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. मी शूटिंग करत असलेल्या फिल्मसिटीजवळ दररोज सुमारे ३० मिनिटे ट्रॅफिक जाम असते. त्यामुळे मी बाइकचा वापर करतो,” असे त्याने संगितले.
शोबद्दल बोलताना अजय म्हणाला की, अपघातानंतर तो सध्या शूटिंग करत नाहीये. तसेच तो म्हणाला की, ‘एकता मॅडम खूप छान आहेत. त्यांनी माझी काळजी घेतली. सध्या मी घरीच रिकवर करत आहे,” असेही तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
dinesh kartik : टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ मॅचविनर खेळाडू जखमी
Rohit : पराभवानंतर प्रचंड भडकला रोहीत; ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार, जाहीरपणे काढली खरडपट्टी
gujarat : गुजरातमध्ये मृत्यूचे तांडव! नदीत पूल कोसळून १५० लोकं बुडाले, आतापर्यंत ३५ मृतदेह बाहेर काढले