नाद खुळा! कोरोनातून बरं झाल्यानंतर पुण्यातल्या ‘या’ वाघाने केले तब्बल ९ वेळा प्लाझ्मा दान

 

 

कोरोनाच्या संकाटाने पुर्ण देशभरात विळखा घातलेला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच अचानक राज्यातील वाढत चालले, असे असले तरी बाजारात कोरोना लस उपलब्ध झालेली नाही.

अशात अनेकांवर प्लाझ्मा उपचारपद्धतीने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना पुण्याचा एक माणूस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर पुण्यातल्या या माणसाने तब्बल ९ वेळा प्लाझ्मा दान केले आहे. पुण्यात राहणाऱ्या या माणसाचे नाव अजय मुनोत असे आहे. ते सध्या ५० वर्षांचे आहे.

गेल्यावर्षी २८ जुलैला मुनोत यांच्या पत्नीला कोरोना झाला होता. त्यानंतर मुनोत हे आजारी पडले, त्यामुळे त्यांना बालेवाडी इथल्या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांना थोडा वेळ श्वसानाचा त्रास झाला होता, दुसरा कोणताही त्रास त्यांना झाला नव्हता.

त्यानंतर ते बरे झाले. त्यावेळी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळे मुनोत यांनी कुठलाही विचार न करता त्याने प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मुनोत यांनी त्यांच्या शरिरात अँटीबॉडीज आहे कि नाही याबाबत चाचणी केली आणि त्यांनी प्लाझ्मा दान करण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा प्लाझ्मा दान केले.

त्यानंतर त्यांना असे कळाले की १४ दिवसांनंतर पुन्हा प्लाझ्मा दान करता येते. तेव्हा त्याने पुन्हा दान करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे मुनोत यांनी ९ वेळा प्लाझ्मा दान केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात मुनोत हे अनेकांसाठी आता प्रेरणादायी ठरत आहे.

प्लाझ्माच्या उपचारपद्धतीने आतापर्यंत अनेक कोरोना रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. प्लाझ्मा दान योग्य असेल तर कितीही वेळा केले जाऊ शकते. पख्त त्यासाठी कोरोनाच्या अँटीबॉडीज शरिरात आहे की नाही याची तपासणी केली जाते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.