दारूच्या नशेतील अजय देवगनाला दिल्लीत मारहाण? स्वता अजयनेच केला खुलासा; म्हणाला..

राजधानी दिल्लीत मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता.

हा व्हिडीओ व्हायरल होत असताना सोशल मिडीयावर असा दावा केला जात होता की या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अजय देवगण आहे. त्यामध्ये असाही दावा केला जात होता की जेव्हा ही घटना घडली तेव्हा अजय देवगण दारूच्या नशेत धुंद होता. पण अजय देवगणने आता स्वता यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजयने ट्वीट करून स्पष्ट केले आहे की तो मी नव्हेच. कदाचित माझा कोणी कार्बन कॉपी अडचणीत सापडला आहे. मला याबाबत सतत कॉल येत आहेत. मी दिल्लीला गोलोच नव्हतो. माझा कोणाशीही वाद झालेला नाही. ही बातमी खोटी आहे, असे ट्वीट त्याने केले आहे.

अजय देवगणच्या टीमनेही स्पष्ट केले आहे की हा त्या व्हिडीओचा आणि अजय देवगणचा काहीच संबंध नाही. अजय देवगण तान्हाजी चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी शेवटचा दिल्लीत गेला होता. त्याचे नाव वापरून कुठलीही अफवा पसरवू नये. जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे टीमने म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये भांडण झालेलं व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. पण ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे त्या व्यक्तीचे हावभाव अजय देवगणशी मिळते जुळते होते त्यामुळे असा गैरसमज झाला होता. त्यामुळे सोशल मिडीयावर अनेक तर्क वितर्क लावले जात होते.

एका ट्विटर युजरने या घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हटले होते की, तो अजय देवगण आहे की नाही हे मला माहित नाही. पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि असा दावा केला जात आहे की मार खाणारी व्यक्ती अजय देवगण आहे.

दरम्यान, या व्हिडीओची पडताळणी केली असता हा व्हिडीओ इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळाजवळील एअरोटीस येथील आहे. या भांडणात बरीच लोकं सामिल होती. आणि संबंधित व्हिडीओचा अजय देवगणशी काहीही संबंध नाही. मुख्य आरोपीला पोलिसांना अटक केली आहे, असे वृत्त न्युज १८ लोकमतने दिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.