…अजय देवगनने अर्धवट हनीमून सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला होता

वरुण धवनने त्याची खुप काळापासूनची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीमध्ये या लग्नाची चर्चा होती. दोघांनी २४ जानेवारीला अलिबागमध्ये लग्न केले. या लग्नात खुप मोजके लोकं उपस्थित होते.

वरून आणि नताशाच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोघे हनीमूनसाठी गेले आहेत. दोघांनी हनीमूनसाठी तुर्कस्तानला जाण्याचा निर्णय घेतला आहे. वरून आणि नताशा प्रमाणेच बॉलीवूडच्या दुसऱ्या कपल्सचे हनीमून डेस्टिनेशन देखील खुपच सुंदर आहेत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा – बॉलीवूडची हॉट आणि ग्लॅमर्स शिल्पा शेट्टीचे आजही लाखो चाहते आहेत. अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य केल्यानंतर शिल्पाने २००९ मध्ये बिजनेस मॅन राज कुंद्राशी लग्न केले होते.

इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या लग्नांमध्ये या लग्नाचा समावेश होतो. या लग्नामध्ये करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. शिल्पाचा ड्रेसच 75 लाखांचा होता. लग्नानंतर हनीमूनसाठी हे दोघे बहामासला गेले होते. हनीमूनसाठी देखील त्यांनी लाखो रुपये खर्च केले होते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली – बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या लग्नाची खुप जास्त चर्चा झाली होती. दोघांच्या जोडीचे करोडो चाहते आहेत. विराट आणि अनुष्काचे ड्रीम वेडिंग होते.

इटलीमध्ये गुपचूप पध्दतीने दोघांनी लग्न केले होते. लग्नानंतर हे नवविवाहित दाम्पत्य हनीमूनसाठी फिनलँडला गेले होते. हे ठिकाण खुपच सुंदर आणि रोमँटिक आहे. दोघांना कोणीही त्रास देऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी हनीमूनला जाण्याचा निर्णय घेतला होता.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत – बॉलीवूडचा कबीर सिंग शाहिद कपूर खऱ्या आयुष्यात देखील तेवढाच रोमँटिक आहे. शाहिदने एका सामान्य घरातील मुलगी मीरा राजपूतशी लग्न केले. लग्नानंतर दोघे लंडनला हनीमूनला गेले होते. त्यांचे हे आवडते ठिकाण आहे.

काजोल आणि अजय देवगन – बॉलीवूडचा सिंघम अजय देवगन खऱ्या आयुष्यात खुप रोमँटिक आहे. दोघांची जोडी खुप प्रसिद्ध आहे. अजय आणि काजोलने १९९९ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर दोघांच्या हनीमूनची स्टोरी खुपच मजेशीर आहे.

अजय आणि काजोलने लग्नानंतर वर्ल्ड टुर करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी तशी तयारी देखील केली होती. दोघांना दोन महिने फिरायचे होते. पण ग्रीसला गेल्यानंतर अजयची तब्येत खराब झाली. त्यामुळे त्यांना त्यांचा हनीमून पूर्ण करता आला नाही. दोघे परत भारतात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.