दारूच्या नशेत असताना मध्यरात्री अजय देवगणला मारहाण? हा व्हिडीओ खरा की खोटा

राजधानी दिल्लीत मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होत असताना सोशल मिडीयावर असा दावा केला जात आहे की या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अजय देवगण आहे. त्यामध्ये असाही दावा केला जात आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा अजय देवगण दारूच्या नशेत धुंद होता.

कार पार्किंगच्या वादावरून त्याची एका व्यक्तीशी बाचाबाची झाली. त्यानंतर त्या वादाचे रूपांतर मारामारीमध्ये झाले. असं असलं तरी अजूनही या व्हिडीओमध्ये नक्की अजय देवगणच आहे की दुसरा कोणी व्यक्ती आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

यामध्ये भांडण झालेलं व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. पण ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे त्या व्यक्तीचे हावभाव अजय देवगणशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

एका ट्विटर युजरने या घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, तो अजय देवगण आहे की नाही हे मला माहित नाही. पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि असा दावा केला जात आहे की मार खाणारी व्यक्ती अजय देवगण आहे.

दरम्यान, या व्हिडीओची पडताळणी केली असता हा व्हिडीओ इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळाजवळील एअरोटीस येथील आहे. या भांडणात बरीच लोकं सामिल होती. आणि संबंधित व्हिडीओचा अजय देवगणशी काहीही संबंध नाही. मुख्य आरोपीला पोलिसांना अटक केली आहे, असे वृत्त न्युज १८ लोकमतने दिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.