स्वत:चे विमान खरेदी करणारा बॉलीवूडचा पहीला अभिनेता आहे अजय देवगन; किंमत ऐकूण थक्क व्हाल

अजय देवगनला बॉलीवूडचा सिंघम बोलले जाते. त्याने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होतो. त्याला चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्माते नाट बघत आहेत. सध्या अजय बॉलीवूडचा सर्वात व्यस्त अभिनेता आहे.

अजय देवगनने १९९१ साली रिलीज झालेल्या ‘फुल औंर कांटे’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पहिल्याच चित्रपटातून अजय रातोरात सुपरस्टार झाला होता. ड्रामा, कॉमेडी, हॉरर आणि रोमॅंटिक अशा सगळ्या प्रकारच्या भुमिकांमध्ये अजयला प्रेक्षकांनी पसंत केले. त्याचा प्रत्येक चित्रपट यशस्वी होतो.

याच कारणामूळे अजय चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी करोडो रुपये घेतो. वर्षाला जाहिराती आणि चित्रपटांमधून अजय ५८ करोड रुपये कमावतो. त्याची एकूण प्रॉपर्टी २९८ करोड आहे. दिवसेंदिवस अजयच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे. तो अनेक महागड्या गोष्टींचा मालक आहे. जाणून घेऊया अजयकडे असणाऱ्या सर्वात महागड्या गोष्टींबद्दल.

प्रायवेट जेट (वैयक्तिक विमान) – बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी यांसारख्या कलाकारांकडे प्रायवेट जेट आहे. या यादीत सिंघम अजय देवगनचा देखील समावेश होतो. या गोष्टीची सुरुवात अजयने केली होती. तो बॉलीवूडचा पहीला अभिनेता आहे. ज्याने स्वत:चे वैयक्तिक विमान खरेदी केले होते. या विमानाची किंमत ८४ करोड आहे.

लंडनमध्ये स्वत: चे घर – बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांचे बाहेर देशात घरे आहेत. अजयचे लंडनमध्ये स्वत: चे घर आहे. या घराची किंमत ९४ करोड आहे. अनेक वेळा अजय आपल्या कुटूंबासोबत लंडनला फिरायला जात असतो. त्यामूळे त्याने कुटूंबासाठी तिथे घर घेतले आहे.

मुंबईत करोडोचा बंगला – अजय देवगन मुंबईत त्याच्या कुटूंबासोबत राहतो. त्याच्या मुंबईतील घराची किंमत १०५ करोड आहे. सर्वात महागड्या घरांपैकी एक अजयचे घर आहे. त्याच्या बंगल्याचे नाव ‘शिवशक्ती’ आहे. त्याच्या या घरात अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहे. पर्यटकांसाठी अजयचे घर आकर्षणाचे केंद्र आहे.

गाड्या – अजय देवगनला गाड्यांची खुप जास्त आवड आहे. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागाड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे सर्वात महागडी गाडी ६ करोडची आहे. अजय बॉलीवूडचा पहीला असा अभिनेता आहे ज्याने त्याच्या गाड्यांसाठी एक गॅरेज खरेदी केले होते. ५० लाखांपासून ६ करोडपर्यंतच्या गाड्या अजयकडे आहेत.

अजय देवगनकडे अनेक महागड्या गोष्टी आहेत. त्याची बायको काजोलकडे देखील अनेक गाड्या आहे. अजयने का मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याच्या संपत्तीसाठी पुढे वाद होणार नाहीत. कारण तो त्याची संपत्ती त्याचा मुलगा युग आणि मुलगी न्यासामध्ये बरोबर वाटणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
अजय देवगन आणि अक्षय कुमारच्या भांडणामध्ये शिल्पा शेट्टी बनली होती बळीचा बकरा
दारूच्या नशेतील अजय देवगनाला दिल्लीत मारहाण? स्वता अजयनेच केला खुलासा; म्हणाला..अजय देवगनने अर्धवट हनीमून सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला होता
बापरे!अजय देवगनसाठी रविना टंडनने स्वतः च्या हाताची नस कापून घेतली होती

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.