Share

शाहरूख खानसोबतच्या भांडणावर पहिल्यांदाच अजय देवगनने सोडले मौन, म्हणाला, आम्ही दोघं..

अभिनेता अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेला नाही. अभिनेता अजय देवगणने १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच वेळी अभिनेता शाहरुख खानचा(Shah Rukh Khan) पहिला चित्रपट ‘दीवाना’ प्रदर्शित झाला होता.(ajay devgan talk about fight with shah rukh khan)

तेव्हापासून अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खानची गणना सुपरस्टारच्या श्रेणीत केली जाते. २०१२ साली बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी अभिनेता शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेता अजय देवगणने या वादावर उघडपणे भाष्य केलं आहे. अभिनेता अजय देवगणने सांगितले की, “९० च्या दशकात ज्या अभिनेत्यांनी माझ्यासोबत कारकिर्दीला सुरुवात केली. त्या सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. शाहरुख खान आणि माझ्याबद्दल मीडियामध्ये जे काही लिहिले जात आहे ते सर्व चुकीचे आहे.”

“आम्ही दोघे एकमेकांना फोन करतो. आमच्यात सर्व काही ठीक आहे. जेव्हा आमच्यापैकी कोणाला काही अडचण येते तेव्हा दुसरा त्याच्या पाठीशी उभा राहतो. आमचा एकमेकांवर विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कधीच कोणतीही अडचण आली नाही”, असे अभिनेता अजय देवगणने मुलाखतीत सांगितले आहे.

अभिनेता अजय देवगणने चाहत्यांवर भांडणे आणि अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे. ज्या चाहत्यांना कोणता अभिनेता चांगला आहे? या विषयावर वाद घालणं आवडतं, ते चाहते अशा अफवा पसरवतात. अभिनेता अजय देवगणने सांगितले की, “जेव्हा चाहते सोशल मीडियावर एकमेकांशी भांडू लागतात. त्यावेळी लोकांना असं वाटू लागतं की दोन कलाकार एकमेकांशी भांडत आहेत. यामधून अशा गोष्टी पसरू लागतात.”

अभिनेता अजय देवगणने पुढे सांगितले की, “मी सर्व चाहत्यांना सांगू इच्छितो की आपण सर्व एक आहोत आणि कृपया तुम्ही भांडू नका.” अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता शाहरुख खानने आतापर्यंत एकत्र चित्रपटात काम केलेले नाही. ‘रनवे 34’ नंतर अभिनेता अजय देवगण ‘दृश्यम 2’, ‘थँक गॉड’, ‘मैदान’ या चित्रपटात दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: शर्टाचे बटन खोलून उर्फी जावेदने केला डान्स, युजर्स म्हणाले, ‘काहीतरी नवीन करत जा’
नोराच्या स्टाईलने वाढवले स्टेजचे तापमान, शेजारी उभ्या असलेल्या रणवीरलाही फुटला घाम
VIDEO: गरीब मुलांनी ‘या’ अभिनेत्याला प्रेमाने मारली मिठी, अभिनेत्याची प्रतिक्रिया पाहून चाहते झाले भावूक

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now