मुलगी न्यासामूळे अजय देवगनवर आली होती झोपेच्या गोळ्या खायची वेळ; जाणून घ्या कारण

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगन त्याची फिटनेस आणि चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण ज्यावेळी गोष्ट कुटूंबावर येते त्यावेळी अजय कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे पुर्णपणे फॅमिली मॅन बनतो. काजोल आणि अजयला दोन मुल आहे. मुलगी न्यासा आणि मुलगा युग देवगन.

अजय देवगनची लाडली आहे त्याची मुलगी न्यासा. लग्नाच्या चार वर्षांनंतर न्यासाचा जन्म २००३ मध्ये झाला होता. न्यासा आत्ता १८ वर्षांची झाली आहे. चित्रपटांपासून दुर असली तरी न्यासा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

न्यासाने तिचे शालेय शिक्षण मुंबईत पुर्ण केले आहे. तर पुढील शिक्षण ती सिंगापूरमध्ये घेत आहे. परिवारापासून दुर राहणाऱ्या न्यासाठी अजयने सगळ्या सुविधा केल्या आहेत. न्यासासाठी अजयने सिंगापूरमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत करोडोंमध्ये आहे.

न्यासा अजयची खुप लाडली आहे. अजयने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, न्यासा खुप समजूतदार आहे. तिला कोणतीही लवकर समजते. त्यामूळे मला तिची काळजी नसते. पण मी माझ्या मुलीसाठी खुप पझेसिव्ह आहे. आई काजोलसोबत देखील न्यासाचे खुप चांगले बॉन्डिंग आहे.

न्यासा अजय खुप पझेसिव्ह आहे. त्यामूळे न्यासा ज्यावेळी शिक्षणासाठी सिंगापूरला गेली होती त्यावेळी अजयल खुप त्रास झाला होता. एवढेच नाही तर मुलीच्या आठवणीने अजयला रात्रभर झोप यायची नाही. म्हणून तो झोपेच्या गोळ्या घ्यायचा.

सुरुवातीला अजयला खुप त्रास झाला होता. पण थोड्या दिवसांनी त्याला सवय झाली. न्यासाला आई वडीलांप्रमाणे बॉलीवूडमध्ये करिअर करायचे नाही. तिला दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. म्हणून ती सध्या खुप मेहनत घेत आहे.

न्यासा हुबेहूब आई काजोलप्रमाणे दिसते. अनेकदा तिला तिच्या कलरवरुन आणि कपड्यांवरुन देखील सोशल मिडीयावर ट्रोल केले जाते. तिने ट्रोलर्सला मला फरक पडत नाही असे उत्तर दिले होते. पण अजयच्या लाडलीला त्याने काहीही फरक पडत नाही. ती तिच्या आयूष्यात आनंदी आहे आणि सध्या तिच्या करिअरवर लक्ष देत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पहा अभिनेत्री लारा दत्ताच्या आलिशान घराचे फोटो; करोडो रुपये खर्च करुन सजवले आहे घर

आजकाल कुठे गायब आहे गोविंदाची ‘आंखे’ चित्रपटातील अभिनेत्री?

अमृताची आई बेगम रुकसानामूळे अमृता आणि विनोद खन्नाचे झाले होते ब्रेकअप?

‘द कपिल शर्मा शो’ मधील ‘हे’ दोन कलाकार लवकरचं अडकणार लग्नाच्या बेडीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.