अजय देवगणने खरेदी केला अलिशान बंगला, पण बंगला खरेदीसाठी घेतले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज

बॉलिवूड सेलिब्रीटी नेहमीच महागड्या वस्तु खरेदी करताना दिसत असतात. त्यांच्या गाड्या असो बंगले असो वा एखाद्या साधीशी गोष्ट सर्वांची किंमत ही कोटींमध्येच असते. त्यामुळे सेलिब्रीटींच्या घर खरेदीची, गाड्या खरेदीची बातमी येतच असते.

अशातच आता प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणने एक अलिशान बंगला घेतल्याची बातमी समोर आली आहे. तसेच या घराची किंमत कोटींमध्ये असून अजय देवगणने या बंगल्यासाठी कर्ज काढले आहे.

अजय देवगणने हा बंगला मुंबईच्या जूहू जवळ खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल ४७.५ कोटी इतकी आहे. हा बंगला त्यांच्या शिवशक्ती बंगल्यापासून जवळच आहे. अजय देवगणचा हा बंगला ४७४.५ वर्ग मीटरमध्ये आहे. या बंगल्याला त्याने आपली आई वीना देवगणच्या नावावर घेतला आहे.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, या बंगल्यासाठी अजय देवगणने तब्बल १९ कोटींच्या आसपास कर्ज घेतले आहे. तसेच मनी कंट्रोल वेबसाईटनुसार, हा बंगला अजय देवगणने डिसेंबर २०२० मध्ये खरेदी केला होता. पण त्याचे कर्ज त्याने यावर्षाच्या एप्रिल महिन्यात घेतले आहे.

अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल, तर त्याची फिल्म तानाजी ही २०२० मध्ये आली होती. अजयची ही फिल्म सुपरहिट ठरली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची पत्नी काजल, अभिनेता सैफ अली खान, शरद केळकर दिसून आले होते.

तसेच लवकरच अजय देवगण सुर्यवंशी, गंगुबाई काठियावाडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अजय आरआरआर, भुज, मैदान, थँक गॉड आणि मेडेसारख्या चित्रपटांमध्ये काम करत आहे.

महत्वाच्याा बातम्या-

तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळतो लाखो रुपये पगार, आकडा वाचून अवाक व्हाल
गावात हिरे सापडतात म्हणून गावकऱ्यांनी दिवसरात्र एक करून खोदला डोंगर, हाती लागली ही मौल्यवान वस्तू
‘हम काले हुए तो क्या हुआ’ गाण्यामूळे मनोज कुमार आणि मेहमूदमध्ये झाले होते मोठे भांडण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.