कोरोनाच्या संकटात सिंघमने घेतला पुढाकार; रुग्णांच्या उपचारासाठी अजय देवगणने उभारले १ कोटी

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रोज साडे तील लाखांपेक्षा जास्त कोरोनाची रुग्णांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत देशातील लोक कोरोनाच्या संकटात मदत आहे. आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लोकांच्या मदतीसाठी मदतीसाठी पुढे आला आहे.

अजय देवगण काही लोकांना सोबत घेऊन बीएससीच्या मदतीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एक एमर्जन्सी युनिट उभारत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कभागात भारत स्काऊट्स अँड गाईड्स हॉलला २० बेडच्या कोव्हिड १९ युनिटच्या स्वरुप देण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, पॅरा मॉनिटर, ऑक्सिजन, अशा सर्व सोयी असणार आहे.

अजयने आनंद पंडीत, बोनी कपुर, लव रंजन, रजनीश खनुजा, लीना यादव, आशिम बजाजा, समीर नायक, दीपक धर, तरुण राठी, आरपी यादव अशा सर्वांची मदत घेऊन या युनिटसाठी १ कोटींपेक्षा जास्त रक्कम उभारली आहे. गेल्यावर्षीही अजयने कोरोनाची लाट आल्यावर धारावीच्या भागात व्हेंटिलेटर्स दान केले होते.

अजय देवगण लवकरच ओटीटीवर डेब्यु करणार आहे. रुद्र द एज ऑफ डार्कनेस या सिरिजमध्ये तो दिसणार आहे. ही वेबसिरिज डिस्निप्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान. कोरोनाच्या संकटात अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढाकार घेत आहे.या आधी अक्षय कुमारनेही क्रिकेटर गौतम गंभीरच्या ट्रस्टला १ कोटी रुपये दान केले होते. ज्यामुळे त्या पैशांनी लोकांची मदत करता येईल.

तसेच या कोरोनाच्या संकटात बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही बिंग हंग्री फुड व्हॅनला सुरुवात केली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून रोज पाच हजार कोरोना वॉरियर्सला जेवण पुरवत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायर झाला होता. ज्यामध्ये तो जेवणाची क्वालिटि चेक करत होता.

महत्वाच्या बातम्या-

“IPL सामन्यांवर केंद्राने बंदी आणून खेळाडूंनी खजिना जनतेसाठी खुला करावा”
उद्योगपतींसोबत घेतलेल्या बैठकीनंतर आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंच्या ‘या’ गोष्टीचं केलं कौतूक; म्हणाले…
सावधान! ही लक्षणे दिसताच घ्या काळजी, तुम्ही असू शकता कोरोना पॉझिटिव्ह; एम्सच्या तज्ज्ञांनी दिली माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.