‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळे कलाकार येत असतात. यावेळी सुद्धा दोन प्रसिद्ध अभिनेते या कार्यक्रमात येणार आहेत. या कार्यक्रमात अभिषेक बच्चन आणि अजय देवगण हजेरी लावणार आहेत.
अभिषेक बच्चन आणि अजय देवगण हे एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे खूप चांगले मित्र आहेत. नुकताच कपिल शर्माचा नवा प्रोमो आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिषेक बच्चन आणि अजय देवगण मजा मस्ती करत कपिलची टर उडवताना दिसत आहेत.
तसेच अभिषेक बच्चनने खुलासा केला आहे की जेव्हा तो कोरोना पॉझिटीव्ह आला होता तेव्हा अजय देवगणने त्याला चांगलेच झापले होते. या शोचा एक प्रोमो व्हिडिओ वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मिडियावरुन शेअर केला आहे.
या प्रोमोमध्ये कपिल अभिषेक बच्चनला तू लॉकडाऊनमध्ये काय केले असे विचारताना दिसत आहे. यावर अभिषेक उत्तर देत आहे की, मी कोरोना… हे त्याचे उत्तर ऐकून उपस्थित असलेले सगळेच खळखळून हसत आहेत. त्यावर कपिल अभिषेकला विचारतो की, तुला कोरोना कसा झाला, त्यावर तो एक मजेदार उत्तर देताना दिसत आहे.
कपिल शर्माला अभिषेक म्हणून बोलायला सांगितलं आणि स्वतः अजय देवगण बनला. त्याने सांगितलं की कोरोना संक्रमित झाल्यानंतर सगळ्यात पहिला फोन त्याला अजय देवगणचाच आला. अजयने त्याला ओरडत विचारलं की हे काय झालं? कसं झालं? यानंतर अभिषेक जोरजोरात हसत म्हणाला की नंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की अजय देवगण काही दिवसांपूर्वीच त्याला भेटला होता.
उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठाला फटकारले; खुलासा करण्याचे दिले आदेश
भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका; ‘अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की…’