अजय देवगन आणि अक्षय कुमारच्या भांडणामध्ये शिल्पा शेट्टी बनली होती बळीचा बकरा

बॉलीवूडमधल्या सर्वात शांत अभिनेत्यांमध्ये अजय देवगनचे नाव येते. अजय स्वाभावाने खुप शांत आणि समजूतदार आहे. त्यामुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख आहे.

बॉलीवूडचा शांत आणि समजूतदार अभिनेता म्हणून ओळख असली तरी अजय देवगनचा राग खुप जास्त आहे. त्याला सहजासहजी राग येत नाही आणि राग आला तर लवकर कमी होत नाही. त्यामुळे त्याच्या रागाचा सामना करायला कलाकार खुप घाबरतात.

अजय देवगनसोबत कोणी दुश्मनी केली तर तो खुप चांगल्या प्रकारे दुश्मनी निभावतो असे बोलले जाते. या गोष्टीचा अनुभव अनेकांना आला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील हा अनुभव आला आहे. अजयच्या दुश्मनीमूळे शिल्पाचे नुकसान झाले होते. जाणून घ्या पुर्ण किस्सा.

अजय देवगन आणि अक्षय कुमारचा ‘सुहाग’ चित्रपट सर्वांनी पाहिला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच हिट झाला होता. चित्रपटात अजय देवगनसोबत अक्षय कुमार देखील मुख्य भुमिकेत होता.

चित्रपटाच्या शुटींग वेळी अजय आणि अक्षयमध्ये काही कारणामुळे वाद झाले.त्यामुळे दोघांनी एकत्र काम करणे बंद केले. अक्षयसोबत भांडण झाल्यामुळे अजयने त्याच्या जवळच्या सगळ्या माणसांसोबत काम करणे बंद केले.

या कालावधीमध्ये अजय देवगनला शिल्पा शेट्टीसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण अजयने शिल्पासोबत काम करायला नकार दिला. कारण त्या वेळेस शिल्पा शेट्टी अक्षय कुमारला डेट करत होती. दोघांच्या अफेअरच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध होत्या.

दोघांच्या अफेअरमूळे अजयने शिल्पासोबत काम करायला नकार दिला. त्यावेळी शिल्पाला काहीही समजले नाही. तिने अजयला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीही ऐकले नाही. अजयने शिल्पाला चित्रपटातून बाहेर काढून टाकले.

अक्षय आणि अजयच्या भांडणामध्ये शिल्पा शेट्टी बळीचा बकरा बनली होती. या एका कारणामुळे अजयने शिल्पाला ४ चित्रपटातून बाहेर काढले होते. ज्यामुळे तिचे करोडोंचे नुकसान झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

टीव्हीवरील संस्कारी सून हिना खानचे ‘बिकिनीशूट’, आपल्या बोल्ड अंदाजात हिना करतेय चाहत्यांना घायाळ

..म्हणून राजेश खन्नाने स्वतःचे चित्रपट पाहणे बंद केले होते

राजेश खन्नाच्या ‘त्या’ सल्ल्यावर डिंपल कपाडियाला झाले होते हसू अनावर; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.