केवळ आईसक्रीमसाठी अजय देवगनने १० तास थांबवली शुटींग; पहा नेमकं काय घडलं..

सर्वांना मस्ती करायला खुप आवडते. त्यामूळे आपण सर्वजण नेहमीच मस्ती करत असतो. बॉलीवूडमध्ये पण अनेक कलाकारांना मस्ती करायला आवडते. या यादीत सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे अभिनेता अजय देवगनचे.

अजय देवगन बॉलीवूडच्या सर्वात शांत कलाकारांपैकी एक आहे. त्याचा स्वभाव खुप शांत आहे. पण जर अजय देवगनने मस्ती करण्याचा निर्णय घेतला. तर मग त्याला कोणीही थांबवू शकत नाही.

अजय देवगनने त्याच्या मस्तीने बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना परेशान केले आहे. त्यामूळे कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर अजय देवगन त्याच्या अगवपणामूळे पण खुप जास्त प्रसिद्ध आहे. अनेक कलाकार याबद्दल तक्रार करत असतात.

असाच एक किस्सा ‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या सेटवर पण झाला होता. या चित्रपटामध्ये अजय देवगन, सलमान खान, आदित्य रॉय कपूर आणि असिन हे मुख्य भुमिकेत होते. भारतासोबतच भारता बाहेरही या चित्रपटाची शुटिंग झाली आहे.

लंडनमध्ये या चित्रपटाची शुटिंग सुरू होती. त्यावेळी हा किस्सा घडला होता. लंडनच्या एका मोठ्या हॉलमध्ये या चित्रपटाची शुटिंग सुरू होती. सकाळी शुटिंग सुरू झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत निर्मात्यांना शुटिंग संपवायची होती.

शुटिंगमध्ये ब्रेक होता. त्यावेळी अजय देवगन, आदित्य रॉय कपूर आणि रणविजय सिंग गप्पा मारत बसले होते. तेव्हा त्या तिघांनी खाण्याबद्दल बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता त्या तिघांनी आईसक्रीमचा विषय काढला.

मग काय या दिघांना पण आईसक्रीम खाण्याची इच्छा झाली. म्हणून या तिघांनी लंडनची सर्वात प्रसिद्ध आईसक्रीम खाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही इच्छा सांगितली.

सुपरस्टार अजय देवगन इच्छा जाहीर करेल आणि त्याला कोणी नाही बोलले. असे होऊच शकत नाही. निर्मात्यांनी त्यांची ही इच्छा पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांना खुप महागात पडला होता.

कारण अजय देवगनने जी आईसक्रीम मागवली होती. ती आईसक्रीम सहजासहजी भेटत नव्हती. निर्मात्यांनी अनेक ठिकाणी ती आईसक्रीम शोधली. पण त्यांना ती भेटली नाही. शेवटी निर्मात्यांनी हार मानली आणि त्यांनी अजय देवगनला ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही असे सांगितले.

अजय देवगनला समजले होते की, ही आईसक्रीम सहजासहजी इथे भेटत नाही. ती कुठे भेटते हे अजय देवगनला माहीती होते. त्याने ती गोष्ट निर्मात्यांना सांगितली नाही. त्याला मस्ती करण्याचा मुड झाला. त्याने चिडण्याचे नाटक केले.

बॉलीवूडमध्ये सर्वांना माहीती आहे की, अजय देवगनला खुप जास्त राग येतो. त्याचा राग शांत करणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे निर्मात्यांनी परत आईसक्रीमचा शोध सुरू केला. ही आईसक्रीम शुटिंग लोकेशनपासून खुप दुर भेटत होती. तिकडे जाण्यासाठी ४ ते ५ तास लागत होते.

ही गोष्ट त्यांनी अजय देवगनला सांगितली. त्यावेळी त्याने मला फक्त आईसक्रीम हवी आहे असे सांगितले. सेटवर सर्वांना त्याचे वागणे एखाद्या लहान मुलासारखे वाटत होते. पण त्याचा हट्ट काहीही करून पूर्ण करावा लागणार होता.

कारण अजय देवगनने निर्मात्यांना सांगितले होते की, जोपर्यंत मला आईसक्रीम मिळणार नाही. तोपर्यंत मी शुटिंग करणार नाही. अनेकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण अजय देवगनच्या हट्टसमोर सर्वांनी हात टेकले होते.

यात खुप वेळ वाया गेला होता. पण अजयचा हट्ट पूर्ण केला नाही. तर मग आपले खुप मोठे नुकसान होईल. त्यामुळे निर्मात्यांना टेन्शन आले होते. शेवटी दहा तासांनंतर ती आईसक्रीम अजय देवगनला मिळाली आणि त्याचा राग शांत झाला.

आईसक्रीम खाऊन झाल्यानंतर अजयने सर्वांना सांगितले की, त्याला राग आला नव्हता. तो फक्त सर्वांची मस्करी करत होता. हे ऐकल्यानंतर सेटवरील सर्वांना मात्र राग आला होता. कारण त्यांचा खुप वेळ वाया गेला होता.

त्यानंतर अजय देवगनने सर्वांची माफी मागितली आणि सर्वांसाठी ती आईसक्रीम मागवली. पण निर्मात्यांचा राग कमी झाला नव्हता. म्हणून अजय देवनगने त्यांचा राग कमी करण्यासाठी लंडनमध्ये चित्रपटाची शुटिंग पूर्ण होत नाही. तोपर्यंत १५ दिवस रोज सर्वांना आईसक्रीम खाऊ घातली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी

‘या’ कारणामुळे बाॅलीवूडची सर्वात हिट जोडी अक्षयकुमार-सुनील शेट्टी एकमेकांचे तोंडही बघत नव्हते

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

बापाने आश्रमात जायचा निर्णय घेतल्यावर पाच वर्षाच्या साध्याभोळ्या अक्षय खन्नाने काय केलते पहा..

वावर एकरभर आणि उत्पन्न लाखांवर; वाचा काय टेक्निक वापरलंय या शेतकऱ्याने

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.