साध्या भोळ्या अजय देवगनचे होते अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर; पहा कोण आहेत त्या

९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये अनेक स्टार किड्सची एन्ट्री झाली होती. जसे की, करिष्मा कपूर, काजोल, सलमान खान, आमिर खान. अनेकांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी बॉलीवूडमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानचे राज्य होते. कारण या तिघांचे अनेक चित्रपट हिट होत होते.

अशा कालावधीमध्ये अजय देवगनने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. अजय देवगनचा बॉलीवूडमधला डेब्यु खुप धमाकेदार झाला होता. त्याचा पहिलाच चित्रपट ‘फुल और कांटे’ बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. म्हणून त्याला खुप कमी वेळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान मिळाले होते.

ऍक्शन हिरो म्हणून अजयला बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण झाली होती. सुरुवातीला तो त्याच्या चित्रपटांमूळे खुप चर्चेत असायचा. पण काही वेळाने तो त्याच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत राहू लागला होता. रोज एका नवीन अभिनेत्रीसोबत अजय देवगनचे नाव जोडले जाऊ लागले होते.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजय देवगनने रविना टंडनसोबत काम केले होते. या दोघांचा ‘दिलवाले’ चित्रपट सुपरहिट झाला होता. म्हणून या दोघांच्या जोडीला तेव्हा खुप मागणी होती. अजय चित्रपटांमध्ये हिरो होता. पण खऱ्या आयुष्यात मात्र तो खुप शांत होता.

अजय देवगनचा स्वभाव खुप शांत आणि समजूतदार होता. त्याच्या या स्वभावामुळे अनेक मुली त्याच्या प्रेमात पागल होत होत्या. रविना टंडन देखील अजयच्या स्वभावावर फिदा झाली होती. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

या दोघांचे नाते खुप चांगले होते. रविनाला अजयसोबत लग्न करायचे होते. या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला माहीती होते. याच कालावधीमध्ये अजयने करिष्मा कपूरसोबत ‘जिगर’ चित्रपट साइन केला.

या चित्रपटाच्या सेटवर अजय आणि करिष्माच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. बोलले जात होते की, अजयने करिष्मा कपूरला डेट करायला सुरुवात केली आहे. ही गोष्ट रविनाला सहन झाली नाही. तिने तिच्या आणि अजयच्या नात्याला वाचवण्याचा खुप प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही.

असे बोलले जाते की, रविना टंडनने अजयसाठी स्वतःच्या हाताची नस कापून घेतली होती. ही गोष्ट अजयला आवडली नाही. त्यामुळे अजयने रविनासोबतचे रिलेशनशिप संपवले. अजयने करिष्मा कपूरला डेट करायला सुरुवात केली.

पण या दोघांचे नाते देखील जास्त काळ टिकू शकले नाही. कारण या दोघांमध्ये काजोलची एन्ट्री झाली. करिष्मा अजय देवगनसाठी काहीही करायला तयार होती. ती स्वतः करिअर सोडायला तयार होती. कारण तिला अजय देवगन हवा होता.

अजय देवगनने काजोलसोबत ‘हालचल’ चित्रपट साइन केला. ज्यामुळे करिष्मा आणि अजयचे नाते संपले. अजय देवगन खुप शांत होता. तर काजोल खुपच बडबडी होती. सुरुवातीला अजयला काजोलचा स्वभाव बिलकुल आवडत नव्हता.

काजोलपासून दुर राहण्यासाठी अजय खुप प्रयत्न करत होता. पण काजोल मात्र काहीही ऐकत नव्हती. काजोल त्यावेळी कमल सदानाला डेट करत होती. अजय करिष्माला डेट करत होता. पण थोड्या दिवसांनी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

काजोल अजयच्या प्रेमात पागल झाली होती. अजयला देखील काजोल आवडायला लागली होती. काजोलला अजयला जाऊ द्यायचे नव्हते. कारण अजय प्रत्येक चित्रपटाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडत होता. ही गोष्ट काजोलला मान्य नव्हती.

म्हणून तिने अजयला लग्नासाठी प्रोपोज केले आणि अजयने देखील लग्नाला होकार दिला. स्वभावाने अतिशय शांत आणि समजूतदार अजय देवगन सुरुवातीच्या काळात अनेक अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

दिलफेक सैफ अली खानला प्रीती झिंटामुळे खावा लागला होता बायको अमृताचा मार

रजनीकांत आणि माधुरी दीक्षितची जवळीक वाढत होती; म्हणून दिग्दर्शकाने चित्रपटाची स्क्रिप्ट बदलली

राजेश खन्नाच्या करिअरचा शेवट यश चोप्रामूळे झाला होता?

म्हणून आई अमृता साराला म्हणाली होती तु तर भिकारी दिसत होतीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.