एकमेकांच्या प्रेमात पडायच्या आधी काजोलचे आणि अजय देवगनचे दुसरीकडेच लफडे सुरू होते

अजय आणि काजोल या दोघांची जोडी बॉलीवूडमधली सर्वात प्रसिद्ध जोडी आहे. इंडस्ट्रीमध्ये या दोघांच्या चर्चा नेहमीच होत असतात. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर यांचे प्रेम अजून टिकून आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्येअनेक लग्न काही वर्षांमध्येच तुटतात. परंतु काजोल आणि अजयने त्यांचे लग्न अजून टिकवले आहे आणि त्यासोबतच त्यांची मैत्री देखील अजून तशीच आहे.

काजोल आणि अजयला त्यांच्या सुखी संसारा राहस्याबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा अजयने याचे उत्तर खुप मजेशीररित्या दिले होते. तो म्हणाला होता की, ‘आमचा संसार अजूनही टिकून आहे. कारण नेहमी काजोल बोलत असते आणि मी फक्त हा उत्तर देतो. त्यामुळे आमच्यात वाद होत नाहीत.’

काजोलला संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात चुलबुली अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. कारण ती खऱ्या आयुष्यात देखील तेवढीच चुलबुली आहे. तिचा स्वभाव हा खुप बडबडा आहे. पण अजय देवगनचा स्वभाव मात्र खुप शांत आहे. कलाविश्वाचे झगमगत तारांगण आजूबाजुला असूनदेखील काजोलने तिचा साधेपणा जपला. कालानुरुप काजोलमध्ये बदल झाले.

तिचा फॅशनसेन्स बदलला. परंतु, तिच्या स्वभावातील साधेपणा आजही कायम आहे. त्यामुळेच आजही तिच्या या साधेपणाचे असंख्य चाहते आहेत. काजोल आणि अजयच्या लव्ह स्टोरीची सुरुवात १९९५ मध्ये झाली होती. या जोडीची पहिली भेट १९९५ साली ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री वाढत गेली आणि पुढे जाऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

काजोलने १९९२ साली ‘बेखूदी’ या चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये पर्दापण केले होते. तर अजयने १९९१ मध्ये ‘फुल और कांटे’ या चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये पर्दापण केले होते. १९९५ साली काजोलने ‘हलचल’ चित्रपट साइन केला होता. पण तिला या चित्रपटामध्ये तिचा सहकलाकार कोण असेल? हेच माहीती नव्हते. अशातच चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती.

काजोलने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. ती म्हणाली की, ‘मी तयार होऊन सेटवर गेले. माझा सहकलाकार कोण असेल हेच मला ठाऊक नव्हते. त्यामुळे मी सेटवर प्रत्येकाला माझ्या सहकलाकाराचे नाव विचारत होते.’ त्याचवेळी एकाने मला कोपऱ्यात बसलेल्या अजयकडे खूण करत हा तुझा सहकलाकार आहे असे सांगितले.

त्यानंतर काम करताना हळूहळू आमची ओळख झाली आणि आमच्यात छान मैत्रीचे नाते निर्माण झाले. पुढे ती म्हणाली की, ‘हलचल चित्रपटाच्या वेळी अजय एका मुलीला डेट करत होता. तर माझ्या आयुष्यातही एक खास व्यक्ती होता. परंतु, आमच्या नात्यात चढउतार येत असल्यामुळे मी बऱ्याच वेळा त्याची तक्रार अजयकडे करायचे.’

याच काळात माझा आणि माझ्या प्रियकराचा ब्रेकअप झाला. परंतु, या प्रसंगात अजयने मला खूप मदत केली. कायम माझ्यासोबत होता. खरे तर मी किंवा अजय आम्ही दोघांनीही कधीच एकमेकांना प्रपोज केले नाही किंवा आमचे प्रेम व्यक्त केले नाही. पण आमच्यात मैत्रीपलिकडे एक नाते होते. याची जाणीव आम्हाला होती. त्यामुळेच एकमेकांप्रती असलेल्या ओढ आणि प्रेमामुळे आम्ही जवळ आलो आणि लग्नाचा निर्णय घेतला.

अजय आणि काजोलने जवळपास ४ वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. परंतु, त्यांचे लग्नदेखील वाटते तितक्या सहजपणे झाले नाही. अजयच्या घरातून लग्नासाठी होकार होता. मात्र, काजोलच्या वडिलांनी तिच्याशी काही काळ बोलणे बंद केले होते. कजोलने करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते.

परंतु, हळूहळू काजोलच्या वडिलांच्या मनातील राग दूर झाली आणि ते अजय आणि काजोलच्या लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर१९९९ मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली. २० वर्षानंतरही यांचा संसार सुखाचा सुरू आहे. त्यासोबतच दोघांनी करिअरवर देखील लक्ष दिले. आज ते दोघेही करिअर मध्ये यशस्वी आहेत.

महत्वाच्या बातम्या –

मधूबाला ‘या’ विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात पागल झाल्या होत्या; घेतला होता लग्न करण्याचा निर्णय

पहा सैफ- करिनाच्या बाळाची पहिली झलक; सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल

जाणून घ्या रेखा आणि बिजनेस मॅन मुकेश अग्रवालच्या लग्नाचे सत्य

‘तसले’ सिनेमे करण्यापेक्षा मी एखाद दुकान टाकून सामान विकेल म्हणणाऱ्या हिरोवर काय दिवस आलेत बघा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.