८ तासांच्या चौकशीनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणी अटक; ३ एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी

 

ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज सप्लायर शादाब बटाटा याने दिलेल्या माहितीवरून प्रसिद्ध अभिनेता एजाज खानला कोर्टाने अटक करण्याचे आदेश दिले आहे. एजाज खानला ३ एप्रिलपर्यंत एनसीबीच्या कस्टडीत ठेवण्यात येणार आहे.

एजाज खान विरोधात काही पुरावे मिळाले, त्यामध्ये एजाज खानचे मॅसेज मिळाले आहे, तसेच काही व्हॉईस नोट्स सुद्धा मिळाल्या आहेत, या सर्व गोष्टी एनसीबीने कोर्टात हजर केल्यामुळे कोर्टाने त्याला कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

एजाज हा एक प्रभावशाली व्यक्ती आहे, त्यामुळे त्याने या गोष्टीचा फायदा घेतला आहे असून तो आपल्या प्रभावाचा गैरवापर करत आहे, असे एनसीबीने कोर्टात म्हटले आहे.

मंगळवारी एजाज राजस्थानवरून मुंबईत आला होता, त्याचवेळी त्याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. तसेच एनसीबीच्या टीमने एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला इथल्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

तसेच स्वतःचा बचाव करत, घरावर टाकलेल्या छाप्याच्या दरम्यान ४ झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत, आणि त्या माझ्या पत्नीच्या होत्या. गर्भपातामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती, त्यामुळे त्याच्यातली एक गोळी ती रोज घ्यायची, असे एजाज खानने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.