शाहरुख खानची पत्नी बनायला ऐश्वर्याने दिला होता नकार; म्हणाली, हा तर…

माजी मिस इंडीया आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयाचो करोडो लोकांची मने जिंकली आहेत. तिच्या सौंदर्यावर आजही तरुण फिदा आहेत. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ऐश्वर्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यासोबतच तिने अनेक हिट चित्रपटांना नकार देखील दिला आहे. ज्यामूळे तिचे खुप जास्त नुकसान झाले होते. एवढेच नाही तर तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला सुपरस्टार शाहरुख खानसोबत काम करायला नकार दिला होता.

१९९७ मध्ये करण जोहर ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटावर काम करत होता. या चित्रपटासाठी तिने शाहरुख खान आणि काजोलला मुख्य कलाकार म्हणून निवडले होते. दुसरी मुख्य अभिनेत्रीची ऑफर ऐश्वर्या रायला दिली होती.

ऐश्वर्याला करिअरच्या सुरुवातीलाच शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. तिला या चित्रपटातील टिनाच्या भुमिकेसाठी निवडण्यात आले होते. पण तिने सरळ सरळ चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रीला या भुमिकेची ऑफर देण्यात आली होती.

रवीना टंडन, करिश्मा कपूर सर्वांनी चित्रपटाला नकार दिला. कारण त्यांना त्यांची भुमिका साइड रोलसारखी वाटत होती. शेवटी हा चित्रपट राणी मुखर्जीकडे गेला. या एका चित्रपटाने राणीचे करिअर बदलून टाकले होते. तिने या चित्रपटाला होकार दिला.

अनेक वर्षांनंतर ऐश्वर्यानंतर कुछ कुछ होता है चित्रपटाला का नकार दिला. याचे रहस्य उघड केले आहे. ती म्हणाली की, मला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली. पण मला टिनाच्या भुमिकेत काहीही वेगळे वाटले नाही. कारण मी अनेक वर्ष मॉडेलिंग करत होते. टिनाची भुमिका देखील एका मॉडेलप्रमाणचे होती. मी तसे वागत होते. त्यामूळे मी त्या चित्रपटाला नकार दिला होता.

ऐश्वर्याच्या ती टिनासारखे आयूष्य जगत होती. त्यामूळे त्या भुमिकेत काहीही नवीन नव्हते. तिला करिअरची सुरुवात वेगळं काही तरी करुन करायची होती. तिने हा चित्रपट केला असता. तर लोकांनी तिची प्रशंसा केली नसती. तिला खुप काही ऐकावे लागले असते.

महत्त्वाच्या बातम्या –

करिश्मा कपूर नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे अक्षय खन्नाचे पहीले प्रेम; नाव वाचून धक्का बसेल

दिलेले वचन माधुरीने पुर्ण केले, खेड्यातील गरीब मुलाला घेतले डान्स दिवानेमध्ये, पहा व्हिडीओ

अक्षयने दिलेला ‘हा’ सल्ला राजेश खन्नांनी ऐकला; ज्यामुळे त्यांना मिळाले आयुष्यभर गमावलेले सुख

‘हम है नये अंदाज क्यों हो पुराना’ गाण्यावर पाठक बाईंचा धमाकेरदार डान्स; व्हिडीओ पाहून तुमचेही पाय थिरकतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.