अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घेणार घटस्फोट? अभिषेकने केला ‘हा’ मोठा खुलासा

बॉलीवूड एक चंदेरी दुनिया आहे. बॉलीवूडमध्ये यशस्वी होणे प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी तुम्हाला खुप जास्त मेहनत करावी लागते. अनेक वर्ष मेहनत केल्यानंतर तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होता. पण हे यश शेवटपर्यंत टिकवणे सोपे नसते.

तुम्ही बॉलीवूडचे मोठे सुपरस्टार असाल तर ही गोष्ट देखील तुमच्या आयूष्यात अनेक बदल आणू शकत. कारण सुपरस्टारचे स्टारडम सांभाळणे प्रत्येकाला जमत नाही. सुपरस्टार असल्यामूळे तुमच्या वैयक्तिक आयूष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

तुमचे स्टारडम तुमच्या वैयक्तिक आयूष्यातील नात्यांवर फरक पाडू शकतात. असे आत्तापर्यंत अनेक कलाकारांसोबत झाले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. दोघांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडते.

ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाली होती. पण खऱ्या आयूष्यात मात्र त्यांची जोडी सुपरहिट झाली आणि त्यांनी लग्न केले. दोघांचे लग्न झाले त्यावेळी ऐश्वर्या बॉलीवूडची सर्वात मोठी अभिनेत्री होती. तर अभिषेक बच्चनने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती.

दोघांच्या स्टारडममध्ये खुप फरक होता. ऐश्वर्या अभिषेक पेक्षा मोठी सुपरस्टार आहे. या गोष्टीचा त्या दोघांना काहीह फरक पडत नाही. पण लोकांना मात्र वेळोवेळी या गोष्टीचा फरक पडला आहे. म्हणून या दोघांबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात.

असे बोलले जात होते की, ऐश्वर्या स्टारडममूळे तिच्या अभिषेकच्या नात्यात खुप अडचणी निर्माण होत आहेत. अभिषेकला ऐश्वर्याचे स्टारडम आवडत नाही. म्हणून त्या दोघांमध्ये भांडण होत असतात. याच गोष्टीमूळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांना वैतागून अभिषेक म्हणाला होता की, हा मी घटस्फोट घेत आहे. मला सांगण्याबद्दल घन्यवाद. मी दुसरे लग्न करणार का हे तुम्ही सांगा. त्याच्या या उत्तराने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती.

एका मुलाखतीमध्ये अभिषेक म्हणाला होता की, ‘सत्य काय आहे हे सर्वांना माहीती आहे. पण तुम्ही स्टार असल्यामूळे तुमच्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातात. या गोष्टीचा आम्ही आमच्या नात्यावर परिणाम होऊ देणार नाही. ऐश्वर्याला माहीती आहे माझे तिच्यावर किती प्रेम आहे. तिला माहीती आहे माझं तिच्यावर किती प्रेम आहे. त्यामूळे याचा परिणाम आमच्या नात्यावर नाही होत’

महत्वाच्या बातम्या –

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.