ऐश्वर्या रायचा ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड ऐकून तुम्हाला बसेल धक्का

ऐश्वर्या राय बच्चनचे नाव आल्यानंतर सर्वात पहिले आपल्या डोळ्यांसमोर येते ते म्हणजे सौंदर्य. आजही ऐश्वर्या अनेकांना तिच्या सौंदर्याने घायाळ करते. तर तिचा अभिनय अनेकांना वेड लावतो.

ऐश्वर्या फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर साऊथ सिनेमा आणि हॉलीवूडमध्ये देखील खुप जास्त प्रसिद्ध आहे. तिने तिच्या अभिनयाने अनेकांना प्रभावित केले आहे. ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि ती बच्चन कुटुंबाची सुन झाली.

लग्नानंतर देखील तिने अभिनय करणे सोडले नाही. तिने ‘सरबजीत’सारख्या चित्रपटातून तिचे अभिनय कौशल्य दाखवून दिले. तर ‘ये दिल है मुश्कील’ चित्रपटातून तिने तिचे ग्लॅमर आणि सौंदर्य दाखवले. सौंदर्य, उत्तम अभिनय कौशल्य आणि ग्लॅमर या सर्वांचे मिश्रण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन.

ऐश्वर्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे देखील खुप जास्त चर्चेत असते. तिची आणि सलमान खानची प्रेमकहाणी सर्वांना माहीती आहे. पण ऐश्वर्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नसतील. जाणून घेऊया त्या गोष्टी.

१)पहिले प्रेम – सर्वांना ऐश्वर्या आणि सलमान खानची प्रेमकहाणी माहिती आहे. त्यामूळे सलमान खानचं ऐश्वर्याचे पहिले प्रेम आहे असे अनेकांना वाटते. पण ते खरे नाही ऐश्वर्या रायचे पहिले प्रेम होते राजीव मुलचंदानी. ऐश्वर्या मॉडेलिंग करत होती तेव्हा या दोघांची भेट झाली होती. पण काही दिवसांनी त्यांचे नाते तुटले.

२)संगीताची आवड – खुप कमी लोकांना माहिती असेल की, ऐश्वर्या रायला संगीताची खुप जास्त आवड आहे. एवढेचं नाही तर ती खुप चांगले गाणे गाते. पण चित्रपटामध्ये काम करताना तिला कधी गाणे गायची संधी मिळाली नाही. त्यामूळे तिचे हे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

३)मॉडेलिंग – ऐश्वर्या रायने मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तिने या दोन्ही स्पर्धांमध्ये खुप उत्तम कामगिरी केली आहे. पण जेव्हा तिला पहिल्यांदा या स्पर्धांसाठी विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने या गोष्टीला नकार दिला होता.

४)राणी मुखर्जी – बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीचं ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या दोघी नेहमी एकमेकांची साथ द्यायच्या. पण या दोघींची मैत्री तुटली. कारण त्यावेळी सलमान खानमूळे ऐश्वर्याला चित्रपटातुन काढून टाकण्यात आले होते. त्या चित्रपटाला राणी मुखर्जीने होकार दिला आणि यांची मैत्री तुटली.

५)ऐश्वर्या राय – बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ऐश्वर्या रायच्या नावावर १७००० वेबसाईट आहेत. त्या सर्व वेबसाईट आजही सुरू आहेत. त्यामूळे हा एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड तिने बनवला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.