या कारणामूळे ऐश्वर्याने नाकारले हॉलीवूडचे चित्रपट म्हणाली मी कुटुंबासाठी…

आत्तापर्यंत बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हॉलीवूडमध्ये देखीव नाव कमावले आहे. यात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नावांचा समावेश होतो. जसे की इरफान खान, बिपाशा बासू असे अनेक कलाकार आहेत.

या यादीत बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायचा देखील समावेश आहे. तिने बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्येही आपल्या नावाचा झेंडा रोवला आहे.

पण ती हॉलीवूडच्या जास्त चित्रपटांमध्ये काम करु शकली नाही. यामागे कारणे अनेक होती. पण खरे कारण कोणालाही माहीती नाही.

पण या गोष्टीला तेव्हाच्या मीडियाने खुप उचलून धरले होते. एवढेच नाही तर ऐश्वर्या करवा चौथसाठी हॉलीवूड स्टारला न भेटता भारतात परत अली. असे देखील बोलले जाते. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय होता हा किस्सा

ऐश्वर्या राय बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. ती चित्रपटांमध्ये येण्याअगोदर पासूनच बॉलीवूडमध्ये तिच्या चर्चा होत होत्या. ऐश्वर्याने ‘इरुवर’ या साऊथ चित्रपटापासून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती.

त्यानंतर बॉबी देओलसोबत ‘और प्यार हो गया’ या चित्रपटापासून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ताल, देवदास यांसारखे सुपरहिट चित्रपट तिने दिले. त्यामूळे बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत ऐश्वर्याचे चर्चे होत होते.

त्यानंतर तिने हॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले. याच कालावधीमध्ये विल स्मिथने ऐश्वर्याबद्दल खुप काही ऐकले होते. ऐश्वर्या देखील विल स्मिथची खुप मोठी फॅन होती.

विल स्मिथ आणि ऐश्वर्या रायला एकमेकांसोबत काम करायची खुप इच्छा होती. त्या दोघांना एकत्र काम करण्याच्या अनेक संधी देखील मिळाल्या होत्या. पण त्या दोघांना एकत्र काम करता आले नाही.

विल स्मिथने ऐश्वर्याला ‘सेवन पाउंड्स’ आणि ‘टुनाईट ही कम्स’ या सिनेमांची ऑफर दिली होती. मात्र यापैकी एकाही सिनेमात ती काम करु शकली नाही कारण तिच्याकडे वेळ नव्हता.

पण त्याकाळी या गोष्टीबद्दल मिडीयामध्ये मात्र अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. अमेरिकेतील माध्यमांनी असे लिहिले होते की, ‘चित्रपटासाठी स्मिथला भेटण्यासाठी ऐश्वर्याकडे वेळ नाही. कारण ती करवा चौथमुळे भुकेली आहे आणि मुंबईला गेली.’

पण या गोष्टीबद्दल जेव्हा ऐश्वर्याला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, ‘हे चुकीचे आहे. सेव्हन पाउंड्स’ ची स्क्रिप्ट दिवाळीनंतर वाचायची होती. पण त्या कालावधीमध्ये आजी यांची तब्येत बिघडली होती. त्यामूळे मी स्मिथला भेटायला जाऊ शकले नाही.’

ऐश्वर्याने पुढे सांगितले की, ‘यात माझी काही चुक नाही आणि मी काही चुकीचे केले नाही. मी कुटूंबासाठी करिअर सोडायला तयार आहे. हॉलीवूडमध्ये नाही जमल तर मी बॉलीवूडमध्ये काम करेल. पण मी माझ्या कुटूंबासोबत कोणतीही रिस्क घेणार नाही.’

असे म्हटले जाते की ऐश्वर्याच्या या वक्तव्यानंतर स्मिथने तिला कोणत्याही चित्रपटाची ऑफर दिली नाही. पण ते दोघे आजही खुप चांगले मित्र आहेत. भविष्यात ऐश्वर्याला चांगली संधी मिळाली तर ती नक्कीच हॉलीवूडमध्ये परत काम करेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.