ऐश्वर्या राय चक्क विवाहीत शिक्षकाच्या प्रेमातच वेडी झाली होती; स्वत:च दिली कबूली

प्रेम तर सर्वजण करतात. पण असे म्हणतात की, पहिले प्रेम खुप खास असते. तुम्ही पहिल्यांदा प्रेमात पडता ती भावना खुप सुंदर असते. म्हणून तुम्ही आयुष्यभर पहिले प्रेम विसरू शकत नाही.

प्रेमाची अजून एक खासियत असते. ती म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी तुमच्या शिक्षकाच्या प्रेमात पडता. ही गोष्ट सर्वांसोबत होते. तुम्ही एकदा तरी शाळा किंवा कॉलेज कुठेही तुमच्या शिक्षकाच्या प्रेमात पडतात.

असे फक्त आपल्यासोबतच होत नाही. अनेक बॉलीवूड कलाकार पण त्यांच्या शिक्षकाच्या प्रेमात पडले होते. आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी तिच्या शिक्षकाच्या प्रेमात पडली होती आणि त्यांना प्रोपोज करणार होती.

ही अभिनेत्री आहे. बॉलीवूडचं नाही तर जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आहे. ती बच्चन कुटुंबाची सुन आहे. तिला एक मुलगी पण आहे.

ऐश्वर्या राय बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. फक्त बॉलीवूडचं नाही तर ऐश्वर्याने हॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ऐश्वर्याने बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असताना ऐश्वर्याने ब्युटी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तिचा विश्व सुंदरी बनण्याचा प्रवास सुरू झाला.

ऐश्वर्या रायच्या जुन्या मैत्रिणीने एका मुलाखती तिची कॉलेज दिवसांतील एक जुनी आठवण सांगितली होती. ऐश्वर्याच्या मैत्रिणीचे नाव शिवानी आहे. ती ऐश्वर्याला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखते.

शिवानीने सांगितले की, ‘कॉलेजमध्ये ऐश्वर्या सर्वात सुंदर मुलगी होती. अनेक मुलं तिच्या मागे फिरत होते. अनेकजण तिला प्रोपोज करत होते. पण ऐश्वर्या मात्र सर्वांना नकार देत होती. कारण त्यावेळी ऐश्वर्याच्या हृदयात दुसरं कोणीतरी जागा बनवली होती’.

ही व्यक्ती आमच्या कॉलेजमधला कोणताही मुलगा नव्हता. ही व्यक्ती आम्हाला शिकवणारे शिक्षक होते. आम्हाला कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवण्यासाठी एक सर होते. ते सर ऐश्वर्याला खुप जास्त आवडत होते.

अनेक वेळा ऐश्वर्या त्यांना इम्प्रेस करण्यासाठी क्लासमध्ये पहिल्या बँचवर जाऊन बसायची. ऐश्वर्याने सरांना प्रोपोज करण्याचा निर्णय घेतला होता. ती त्यांना प्रोपोज करणार होती. पण शेवटच्या क्षणी तिला समजले की, सर अगोदरपासूनच विवाहित आहेत. म्हणून तिने प्रोपोज केले नाही.

ऐश्वर्याने देखील एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा स्वीकार केला आहे. ती म्हणाली की, ‘ही गोष्ट खरी आहे. पण त्यावेळी मी लहान होते. त्यामूळे ते सर माझे क्रश होते. प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट घडते. माझ्या आयुष्यात पण घडली होती’.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ हिरोईनच्या प्रेमात पागल झाला होता बाॅबी देओल; पण केवळ वडीलांच्या इच्छेखातीर..

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

खळबळजनक! ‘त्या’ कामासाठी अभिनेत्रीने अभिनेत्यासमोर काढला अंगातला शर्ट; व्हिडीओ व्हायरल

रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी

एकेकाळी ज्या अभिनेत्याला करिष्माने हाकलून दिले होते तो पुढे जाऊन बाॅलीवूडचा स्टार झाला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.