‘या’ पाच महागड्या गोष्टींची मालकीन आहे ऐश्वर्या राय बच्चन

बॉलीवूड अभिनेत्यांकडे पैशांची कमी नाही. अनेक कलाकार करोडो रूपयांचे मालक आहेत. शाहरुख खान, सलमान खानसोबत अनेक कलाकार करोडोचे मालक आहेत. पैशांच्या बाबीत बॉलीवूड अभिनेत्र्या देखील मागे नाहीत.

बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री करोडोच्या मालकीन आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्र्यांमध्ये ऐश्वर्याचे नाव येते. तिने तिच्या मनमोहक नखऱ्यांनी अनेकांना घायाळ केले आहे.

ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून थोडी लांब गेली आहे. पण तरीही ती वर्षाला करोडो रुपये कमावते. जाणून घेऊया ऐश्वर्या राय बच्चनच्या एकूण संपत्तीबद्दल.

१९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता. त्यानंतर तिने एका तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. खुपच कमी वेळात ऐश्वर्या बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री झाली होती. ऐश्वर्याने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यांंसोबत काम केले आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर ऐश्वर्याने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. हम दिल दे चुके सनम आणि देवदास चित्रपटासाठी ऐश्वर्याने सर्वोत्तम अभिनेत्रीचा अवॉर्ड जिंकला आहे. त्यासोबतच तिने अनेक चित्रपटांसाठी वेगवेगळे अवॉर्ड जिंकले आहेत.

आज चित्रपटांपासून लांब असणाऱ्या ऐश्वर्याची एकूण संपत्ती २५८ करोड आहे. ऐश्वर्याकडे तिचा पती अभिषेक बच्चनपेक्षाही जास्त संपत्ती आहे. ऐश्वर्या एका चित्रपटासाठी ९ करोड रुपये घेते. त्यासोबतच ती अनेक ब्रँड्सची प्रमुख आहे.

ऐश्वर्या रायचा दुबईत एक मोठा बंगला आहे. तिच्या या घराची किंमत सोळा करोड आहे. काही वर्षांपूर्वी ऐश्वर्याने हे घर खरेदी केले होते. आत्ता या घराची किंमत दुप्पट झाली आहे. अनेक वेळा ऐश्वर्या आपल्या कुटुंबासोबत दुबईला फिरायला जात असते.

दुबईसोबत ऐश्वर्याचे मुंबईत देखील घर आहे. मुंबईत ऐश्वर्याचा पाच बीएचके फ्लॅट आहे. ऐश्वर्याच्या मुंबईतील घराची किंमत २३ करोड आहे. खुप कमी वेळेस ऐश्वर्या तिच्या या घरात राहायला जात असते. ऐश्वर्याच्या या घरात अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

ऐश्वर्याला गाड्यांची खुप जास्त आवड आहे. म्हणून तिच्या अनेक मोठ्या गाड्या आहेत. ऐश्वर्याकडे चार गाड्या अशा आहेत ज्यांची किंमत दोन ते तीन करोडच्या जवळ आहे. ऐश्वर्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत.

ऐश्वर्याने तिच्या लग्नात ७५ लाखांची साडी घातली होती. त्यामुळे ऐश्वर्याच्या साडीची खुप जास्त चर्चा झाली होती. त्यासोबतच ऐश्वर्याच्या हातात ५० लाखांची हिऱ्यांची अंगठी आहे. एवढेच नाही तर ऐश्वर्याच्या मंगळसूत्राची किंमत २ करोड आहे.

ऐश्वर्या आज चित्रपटांपासून लांब असली तरी ती अनेक जाहिरातींचा भाग आहे. जाहिराती आणि चित्रपटांतून ऐश्वर्या वर्षाला करोडो रुपये कमावते. म्हणून ती बॉलीवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आमिषा पटेलचे करिअर खराब करण्यासाठी करीना कपूरने केले होते ‘हे’ काम

शेखर सुमनने ‘उत्सव’ चित्रपटात रेखासोबत दिले आहेत अनेक इंटिमेट सीन्स; तुमचा विश्वास बसणार नाही

या’ अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते सोनाली बेंद्रेचे नाव; एक तर होता विवाहित

संजय दत्तच्या गर्लफ्रेंडला किस केल्यामुळे धर्मेंद्रने खाल्ला होता संजू बाबाचा मार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.