आमच्यात भांडण झाले की आम्ही…; अभिषेक – ऐश्वर्याने सांगीतली ‘ती’ सिक्रेट गोष्ट

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधले प्रसिद्ध जोडपे आहे. हे दोघेही नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत असतात. तसेच त्यांच्या आयुष्यात काय होत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहतेही धडपड करत असतात.

दोघेही सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असतात. आता दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आलेय यावेळी चर्चेचे कारण जरा वेगळेच आहे. ऐश्वर्याचे आणि अभिषेकचे जेव्हा भांडणं होतात, तेव्हा नक्की काय होत, त्याबद्दल हे समोर आले आहे.

सर्वाच चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रींटींच्या खाजगी आयुष्यात काय चालू असते, हे जाणून घेण्यात रस असतो. त्यामुळे ऐश्वर्याने जेव्हा त्यांच्या घरातील भांडणाबद्दल सांगितले तेव्हा चाहत्यांनाही कलाकारांच्या आयुष्यातील माहिती मिळाल्याने ते भलतेच खुश झाले आहे.

अभिषेक बच्चनचा एक जुना व्हिडिओ खुप व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो म्हणताना दिसत आहे, की जेव्हा पण माझे आईचे किंवा माझे ऐश्वायाचे भांडण झाले, तर दोघी पण माझ्यासोबत बंगालीमध्ये भांडण करत असतात.

तसेच माझी आई जया बच्चन आणि माझी पत्नी ऐश्वर्या यांना दोघांनाही माझ्याबद्दल बोलायचे असेल, तर बंगालीतच बोलतात. जया बच्चन यांना बंगाली खुप चांगल्या पद्धतीने येते. तर ऐश्वर्याने ऋतुपर्णो घोष यांच्या चोखेर बाली चित्रपटाच्या वेळी बंगाली भाषा शिकली होती.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी ऐश्वर्याने आपल्या आईच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले होते. त्याला चाहत्यांनी खुप प्रतिसाद दिला होता. आता तर दोघांची मुलगी आराध्याही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाली असून ती अभिषेकसोबत बॉब विश्वासमध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन खुले, कोरोना जाए तो फिर से धंदे पे लगे! मिर्झापूरमधील हा अभिनेता विकतोय लाडू
तिने कोरोना लसीचा एक डोस घेतला आणि ती झाली तब्बल ७ कोटींची मालकीण, वाचा सविस्तर..
लवकरच रोहीत शर्माला टिम इंडीयाचा कॅप्टन करणार; बीसीसीआयच्या माजी सिलेक्टरचे वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.