नवऱ्याच्या नकळत त्याचा फोन चेक करतेस का? ऐश्वर्याच्या उत्तराने सगळ्यांची झाली बोलती बंद

फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोड्यांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या जोडीचा समावेश होतो. २००७ मध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर देखील दोघे आनंदाचे एकत्र राहत आहेत. ऐश्वर्या अभिषेकला आराध्या नावाची मुलगी आहे.

चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहीली भेट झाली होती. गुरु चित्रपटाच्या शुटींग वेळी दोघांच्या प्रेम कहानील सुरुवात झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अनेकदा दोघे वेगळे होत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्या बातम्या खोट्या ठरल्या.

इंडस्ट्रीमध्ये नेहमी अफवा उडत असतात की, ऐश्वर्याचे तिच्या सासरच्या माणसांसोबत चांगले संबंध नाही. ऐश्वर्याने या गोष्टींना नेहमी खोटं ठरवले आहे. ती तिचे कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिशी चांगले संबंध असल्याचे तिने म्हटंले आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याबद्दल देखील अनेक अफवा येत असतात. एका कार्यक्रमामध्ये ऐश्वर्याला विचारण्यात आले होते की, ती कधी अभिषेकचा फोन चेक करते का? अभिषेक नसताना तिने कधी त्याचा फोन चेक केला आहे का?

हा प्रश्न विचारल्यानंतर ऐश्वर्या थोडा वेळ गप्प बसली. त्यानंतर तिने या प्रश्नाचे उत्तर दिले. ती म्हणाली की, ‘नाही मी कधीच अभिषेक नसताना त्याचा फोन चेक केला नाही. मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. ज्या पती पत्नीच्या नात्यात विश्वास असतो. तिथे या गोष्टी घडत नाहीत’.

ती पुढे म्हणाली की, ‘मी कधीच त्याचा फोन चेक करत नाही. कारण ती त्याची पर्सनल स्पेस आहे. कोणत्याही नवऱ्याची अपेक्षा असते की, त्याच्या पत्नीने त्याला समजून घेतले पाहीजे. जर तुम्ही तुमचा नवरा नसताना त्याचा फोन चेक करत असाल तर मग तुमचा त्याच्यावर विश्वास नाही असा अर्थ होतो. कोणतेही नातं विश्वासावर टिकते. त्यामूळे नात्यातील विश्वास कमी होईल असे काहीही करु नका’.

महत्वाच्या बातम्या –

संजू बाबाला किस करायला घाबरत होती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; मग वडीलांनी दिली ट्रेनिंग

नेहा पेंडसेला साडीमध्ये पाहून चाहत्यांच्या हृदयाची ठोके वाढले; पहा फोटो

नशेत धुंद धर्मेंद्रने मंत्र्याच्या पत्नीला केले होते जबरदस्ती किस; झाला होता मोठा तमाशा

प्रियंका चोप्राने ट्रान्सपरंट ड्रेस घालून उडवली चाहत्यांची झोप; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.