आईशपथ! ‘तारक मेहता…’ फेम बबिताजी करतेय 9 वर्ष लहान अभिनेत्याला डेट, नाव ऐकून बसेल धक्का

मुंबई। ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमधील टप्पू व सर्वांची आवडती बबिताजी यांच्याबद्दल शॉकिंग माहिती सध्या समोर येत आहे. बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता एका व्यक्तीला डेट करत आहेत. ही व्यक्ती म्हणजे राज अनादकत आहे.

राज अनादक म्हणजे या शोमधील जेठालालचा मुलगा टप्पू आहे. सध्या हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असून सर्वांनाच धक्का बसला आहे. तारक मेहता या शोमध्ये जेठालालला बबिताजी मनापासून आवडतात. बबिताजीची एक झलक पाहण्यासाठी झेठालाल काहीही करायला तयार आहे.

मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र चित्र वेगळं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि अभिनेता राज अनादकत दोघेही एकमेकांना खूप पसंत करत असल्याची चर्चा आहे. अनेकवेळा राज मुनमुनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, तिच्या फोटोंवर अशा प्रकारे कमेंट करतो की, हे दर्शवते की दोघेही खूप चांगले आणि एकमेकांचे जवळचे मित्र आहेत.

पण आता दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काही संबंध असल्याचे समोर आले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीममधील प्रत्येक सदस्याला दोघांमध्ये काय चालले आहे याची जाणीव आहे. या प्रकरणाशी संबंधित एक सूत्र म्हणतो, ‘मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांच्या कुटुंबीयांनाही सर्वकाही माहीत आहे, कोणीही अंधारात नाही.’

त्यामुळे आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगल्या आहेत. राज आणि मुनमुन यांच्यात वयाचे 9 वर्षांचे अंतर आहे. मुनमुन दत्ता राज अनादकतपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. तसे, या बातमीवर आतापर्यंत मुनमुन किंवा राज यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यांच्या नात्याचे सत्य जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. हा शो 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. जरी या शोला 13 वर्ष झाली असली तरी अजूनही हा शो त्याचं जोशात नवनवीन एपिसोड चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
मुंबई इंडियन्सची हवा! वर्ल्डकपसाठी टिम इंडीयात मुंबई इंडियन्सच्या तब्बल ६ खेळाडूंची निवड
सगळा रस्ता कंडोंमने भरलाय! हायवेर कंडोमचा खच पाहूण उडाली खळबळ
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव शिवसेनेमुळे झाला असं लोकं का म्हणतात? वाचा..
मोठी बातमी! गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी, कलम १४४ लागू, ७ हजार पोलीसांचा खडा पहारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.