‘माझं शिक्षण कुटुंबावर ओझं झालय पण शिक्षणाशिवाय मी जगू शकत नाही’ म्हणत मुलीची आत्मह.त्या

श्री राम महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या रेड्डी हिने आर्थिक अडचणीमुळे तेलंगणा राज्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षण बंद झाले म्हणून या विद्यार्थीनीने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी घडली.

आता या विद्यार्थीनीची म्हणजे ऐश्वर्याची सुसाईड नोट समोर आली आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये ऐश्वर्याने लिहिले आहे की “माझ्या घरातल्या बऱ्याच खर्चांचं कारण मी आहे. मी ओझं बनले आहे. माझं शिक्षण ओझं आहे. शिक्षणाशिवाय मी जगू शकत नाही.”

तसेच “माझ्या मृत्यूसाठी कुणीच जबाबदार नाही. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप खर्च करावा लागतोय. मी ओझं बनले आहे. माझं शिक्षण ओझं आहे. मी याविषयी बराच काळापासून विचार करत होते.

“माझ्या समस्येवर मृत्यू हाच एकमेव उपाय असल्याचे मला वाटते. माझ्या मृत्यूसाठी अनेक कारणे सांगितली जाऊ शकतात. पण, माझा हेतू वाईट नाही. मला वर्षभरासाठी इन्स्पायर स्कॉलरशीप मिळावी, यासाठी कृपया प्रयत्न करा. मला माफ करा. मी चांगली मुलगी होऊ शकले नाही.”

ऐश्वर्याला खुप अभ्यास करायचा होता, परंतु पैशाअभावी तिला लॅपटॉप खरेदी करता आला नाही. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत झाले. बारावीत तिला ९८ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. त्यावर्षी ती तिच्या शहरात ती पहिली आली होती.

तिला प्रशासकीय सेवेत जायचे होते. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करायचे होते. ऑनलाईन क्लास करायची तिची इच्छा होती. पण, त्यांच्याकडे कोचिंगसाठी पैसे नव्हते. वर्षभरानंतर हॉस्टेलमधून काढून टाकले जाण्याची भीती तिला सतावत होती. शिवाय, ऑनलाईन क्लाससाठी लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तिला बऱ्याच अडचणी येत होत्या. पण बिचारीने आपले आयुष्य संपवून टाकले.

‘परदेस’ चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याऱ्या अभिनेत्री आज ‘अशी’ दिसते

नेतृत्व करण्यासाठी जी योग्यता लागते ती राहुल गांधींमध्ये नाही- बराक ओबामा

बोबडी वळलीये, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही; सोमय्यांना नाईक कुटुंबीयांनी खडसावले 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.