Share

AAI Recruitment 2025 : सुवर्णसंधी! भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 976 जागांसाठी भरती, ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख

AAI Recruitment 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) मध्ये विविध तांत्रिक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ही संधी ऑनलाईन अर्जाद्वारे मिळणार असून अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल आणि 27 सप्टेंबर 2025 रोजी अर्ज करण्याची अंतिम मुदत असेल.

एकूण 976 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे, ज्यात अभियांत्रिकीच्या विविध शाखा आणि आयटी क्षेत्रातील पदांचा समावेश आहे.

उपलब्ध पदे आणि पदसंख्या

  1. ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) – 11 पदे

  2. ज्युनियर एक्झिक्युटिव (अभियांत्रिकी – सिव्हिल) – 199 पदे

  3. ज्युनियर एक्झिक्युटिव (अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल) – 208 पदे

  4. ज्युनियर एक्झिक्युटिव (अभियांत्रिकी – इलेक्ट्रॉनिक्स) – 527 पदे

  5. ज्युनियर एक्झिक्युटिव (आयटी) – 31 पदे

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 – आर्किटेक्चर पदवी आणि GATE 2023/2024/2025 मध्ये पात्रता.

  • पद क्र. 2 – बी.ई./बी.टेक (सिव्हिल) आणि GATE 2023/2024/2025 पात्रता.

  • पद क्र. 3 – बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रिकल) आणि GATE 2023/2024/2025 पात्रता.

  • पद क्र. 4 – बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / इलेक्ट्रिकल) आणि GATE 2023/2024/2025 पात्रता.

  • पद क्र. 5 – बी.ई./बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एमसीए, तसेच GATE 2023/2024/2025 पात्रता.

वयोमर्यादा

  • 27 सप्टेंबर 2025 रोजी वय 18 ते 27 वर्षे असावे.

  • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) – 5 वर्षे सूट

  • इतर मागासवर्ग (OBC) – 3 वर्षे सूट

परीक्षा फी

  • सामान्य / ओबीसी / EWS – ₹300/-

  • SC/ST/ExSM/PWD/महिला – फी नाही

पगार

  • दरमहा ₹40,000 ते ₹1,40,000 वेतनमान मिळेल.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 ऑगस्ट 2025

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2025

  • परीक्षेची तारीख – नंतर जाहीर केली जाईल

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारतभर (All India)

अधिकृत संकेतस्थळ: www.aai.aero

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now